मराठी बातम्या /बातम्या /विदेश /लोकसंख्या वाढीसाठी चिनी कंपन्यांनी Overtime केला रद्द; देशाचा प्रजनन दर वाढण्यासाठी अशीही योजना

लोकसंख्या वाढीसाठी चिनी कंपन्यांनी Overtime केला रद्द; देशाचा प्रजनन दर वाढण्यासाठी अशीही योजना

मागील वर्षी चीनचा राष्ट्रीय प्रजनन दर 1.3 या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. त्यामुळे घरात पाळणा हलावा यासाठी सरकारने कंबर कसली आहे.

मागील वर्षी चीनचा राष्ट्रीय प्रजनन दर 1.3 या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. त्यामुळे घरात पाळणा हलावा यासाठी सरकारने कंबर कसली आहे.

मागील वर्षी चीनचा राष्ट्रीय प्रजनन दर 1.3 या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. त्यामुळे घरात पाळणा हलावा यासाठी सरकारने कंबर कसली आहे.

  बीजिंग, चीन, 17 जुलै : जगातील सर्वाधिक लोकसंख्या (Population) असलेला देश चीन (China) आता एका वेगळ्याच चिंतेत आहे. या देशाची लोकसंख्या गेली अनेक वर्षं सर्वाधिक आहे. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रणासाठी चीनने काही वर्षांपूर्वी पावलं उचलली होती. परिणामी लोकसंख्या नियंत्रणात बऱ्याच अंशी यश आले. मात्र आता चीनला एका वेगळ्या चिंतेनं ग्रासलं आहे. चीनमधील घटत्या जन्मदराचा (Birth Rate) परिणाम लोकसंख्येवर होताना दिसत आहे. मागील वर्षी चीनचा राष्ट्रीय प्रजनन दर 1.3 या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. एकीकडे लोकसंख्येत घट होत असताना दुसरीकडे चीन लैंगिक गुणोत्तरामुळेही अस्वस्थ झाला आहे. या गुणोत्तरामुळे चिनी मुलांना विवाहासाठी मुली मिळत नसल्याचे चित्र आहे. या सर्व गोष्टींचे अवलोकन करता चीन काही महत्वाचे निर्णय घेत आहे. प्रजनन दर (Reproduction Rate) वाढावा यासाठी सरकारी पातळीवर पावलं उचलण्यात येत असून, याला पाठिंबा दर्शवण्यासाठी काही कंपन्यांनी देखील पुढाकार घेतला आहे. युवक कामगारांना कुटुंब विस्तारासाठी पुरेसा वेळ मिळावा, त्यांचे खासगी आणि कौटुंबिक आयुष्य सुधारावे यासाठी कामकाजासाठीचा ओव्हरटाईम (Overtime) रद्द करण्याचा निर्णय चीनने घेतला आहे.

  हे ही वाचाच-चीन समुद्रात पसरवत आहे अशी घाण! सॅटेलाईट इमेजमध्ये दिसले सांडपाणी, घाणीचे ढीग

  भविष्यातील समस्या पाहता पावले उचलण्यास सुरुवात

  एक काळ असा होता की वाढत्या लोकसंख्येमुळे चीन चिंताग्रस्त होता. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी चीनने सर्वतोपरी प्रयत्न करत विविध योजनांची अंमलबजावणी (Execution) केली होती. परिणामी लोकसंख्येत घट झाल्याचे पाहायला मिळाले. पण आता चित्र अगदी उलटे आहे. ही अशी स्थिती राहिली तर भविष्यकाळात मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रजनन दरवाढीसाठी चीनने पावले उचलण्यास सुरुवात केली आहेत. त्याला उद्योग क्षेत्रातून पाठिंबा मिळत आहे.

  कामाच्या वेळा कमी करण्याची मागणी

  एका अहवालानुसार, सध्या चीनमध्ये सर्व कामगार, नोकरदारांना सकाळी 9 ते रात्री 9 यावेळेत सहा दिवस काम करावे लागते. याचा परिणाम त्यांच्या कौटुंबिक आयुष्यावर (Family Life) होत आहे. अनेक दांपत्य कुटुंबासाठी पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. तसेच या कामाच्या वेळेचा परिणाम कामगार, नोकरदारांच्या शारीरिक, मानसिक आरोग्यावर होत आहे. पर्सनल लाईफ (Personal Life) आणि प्रोफेशनल लाईफ (Professional Life) यांचा समतोल ढासळत आहे. त्यामुळे कामांच्या वेळा कमी कराव्यात अशी मागणी हा वर्ग सातत्याने करीत आहे. याच अनुषंगाने आता चीनमधील काही कंपन्यांनी पावले उचलण्यास सुरुवात केली असल्याचे झी न्यूज हिंदीने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

  बाईटडान्स करणार ओव्हरटाईम पॉलिसी रद्द

  इंडिपेंडंटच्या वृत्तानुसार, चीनमधील टेक कंपनी बाईटडान्स (ByteDance) सह अन्य दोन कंपन्यांनी आपली ओव्हरटाइम पॉलिसी (Overtime Policy) रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. टिकटॉकची पालक कंपनी असलेल्या बाईटडान्स कंपनीने कामगार, नोकरदारांना खासगी आयुष्यासाठी पुरेसा वेळ देता यावा, काम आणि कौटुंबिक आयुष्य यात समतोल साधता यावा, यासाठी असा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट केले. या निर्णयामुळे राष्ट्रीय उद्देश साध्य करण्यासाठी हातभार लागणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 1 ऑगस्टपासून सुरु केली जाणार असल्याचे कंपनीने सांगितले. काही कंपन्या या निर्णयाचे अनुकरण करुन ओव्हरटाइम पॉलिसी रद्द करण्याचा विचार करीत आहेत.

  First published:

  Tags: China, China phone, Elderly population