मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

चीनच्या Tik Tokची मालकी आता अमेरिकन कंपनीकडे येणार, ‘ड्रगन’ला धक्का

चीनच्या Tik Tokची मालकी आता अमेरिकन कंपनीकडे येणार, ‘ड्रगन’ला धक्का

या कंपन्यांची मालकी अमेरिकन कंपन्याकडे आली नाही तर त्यावर बंदी घातली जाईल असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता.

या कंपन्यांची मालकी अमेरिकन कंपन्याकडे आली नाही तर त्यावर बंदी घातली जाईल असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता.

या कंपन्यांची मालकी अमेरिकन कंपन्याकडे आली नाही तर त्यावर बंदी घातली जाईल असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता.

  • Published by:  Ajay Kautikwar
वॉशिग्टंन 20 सप्टेंबर: अमेरिकेची सॉफ्टवेअर कंपनी ओरॅकला चीनची व्हिडियो शेयरिंग App कंपनी बाइटडांसला विकत घेणार आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी या कराराला मंजूरी दिली आहे. वॉलमार्टही या कराराचा एक भाग असेल अशी माहितीही ट्रम्प यांनी दिली. टेक्सासमध्ये या कंपनीचं ऑफिस असणार असून टिकटॉक (Tik Tok)ची मालकी त्यामुळे अमेरिकेकडे येणार आहे. हे प्रकरण अमेरिकन कोर्टातही गेलं होत. अमेरिका आणि चीनमध्ये संबंध बिघडल्यानंतर दोन्ही देशांमध्ये व्यापार युद्धाला सुरूवात झाली होती. अमेरिका चिनी मालांवर सूट देते मात्र चीन अमेरिकन कंपन्यांना सवलती देत नाही असा अमेरिकेचा आरोप आहे. चीनने WeChat आणि Tik Tok वर बंदी घालण्याच्या निर्णयाला विरोध केला होता. या कंपन्यांची मालकी अमेरिकन कंपन्याकडे आली नाही तर त्यावर बंदी घातली जाईल असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता. या Appsमुळे अमेरिकेच्या सुरक्षेला धोका असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं होतं. पबजी खेळता खेळता पार्टनरच्या प्रेमात पडली, अन् पुढे असं काही घडलं की.... या कंपन्या वापरकर्त्यांचा डेटा चोरतात असा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळेच भारतातही त्यावर बंदी घालण्यात आली आहे. जगभर या Appचा वापर केला जातो आणि त्या माध्यमातून या कंपन्यांची हजारो कोटींची कमाई होत असते. भारतातची चिनी कंपन्यांवर निर्बंध आणि Appsवर बंदी चीनच्या 118 Appsवर बंदी घातल्यानंतर भारताने चीनला आणखी एक मोठा दणका दिला आहे. चीन मधून आयात होणारं औषध सिप्रोफ्लोक्सासिन (Anti-Bacterial Drug Ciprofloxacin)वर Anti-Dumping Duty लावण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच घेण्यात आला आहे. त्यामुळे त्यामुळे चिनी औषध कंपन्यांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. अर्थमंत्रालयाने यासंदर्भातला निर्णय घेतला आहे. Made In China असं लिहिलेल्या औषधांवर हा कर लागणार आहे. ओषधं चीनमधून किंवा इतर देशांमधूनही आयात करण्यात आल्यावरही  त्यांना Anti-Dumping Duty दयावी लागणार आहे. देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचा उच्चांक, 24 तासांत 94 हजार जणांना डिस्चार्ज देशातल्या काही कंपन्यांच्या तक्रारींच्या आधारे चौकशी करून हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर अभ्यास केल्यानंतर भारतातल्या कंपन्यांना नुकसान होत असल्याचं आढळून आलं होतं. 2015-16 मध्ये 117 औषधांसाठीचा कच्चा माल आयत करण्यात आला होता. 2018-2019मध्ये त्याचं प्रमाण हे 377 टनांवर गेलं होतं. त्यामुळे देशी कंपन्यांना होणारं नुकसान थांबविण्यासाठी चिनी आयातीवर अँटी-डम्पिंग ड्यूटी लावण्याची शिफारस करण्यात आली होती.
First published:

Tags: China, Tik tok

पुढील बातम्या