बीजिंग, 01 एप्रिल : कोरोनाव्हायरसची मुळ सुरुवात चीनमधील वुहानपासून झाली असे मानले जाते. मात्र सध्या चीनमधील कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे. दरम्यान चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर काही डॉक्टरांनी सरकारला अलर्ट केले होते. मात्र सरकारने त्यांचे म्हणणे ऐकले नाही. यातील एक डॉक्टर, एई फेन धक्कादायकरित्या बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. डॉ. एई फेन यांनी सार्वजनिकपणे कोरोनाबाबत जगाला इशारा दिला होता. त्यांनी चिनी सरकारवर टीकाही केली आहे. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार सरकारवर टीका केल्याबद्दल त्यांना अटक केले असावे. एई फेनवर चीनमधील कोरोनाशी संबंधित गुप्त माहिती सार्वजनिक केल्याचा आरोप आहे. वाचा- अखेर कोरोनाला मारण्याचा उपाय सापडला! WHO करणार शेवटची तपासणी एई फेन यांना दिल्या जात होत्या धमक्या डॉ. एई यांनी काही दिवसांपूर्वी, सरकारवर टीका केल्यानंतर त्यांना सतत धमक्या येत असल्याचे सांगितले होते. वुहान सेंट्रल हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी केवळ त्यांची बदनामी केली नाही त्यांना मारण्याची धमकी देण्यात आल्याचे सांगितले होते. डॉ एईच्या अगोदर आणखी एक चिनी डॉक्टर ली वेलियांग यांनीही कोरोना विषाणूबाबत चीनी सरकारच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. चिनी अधिकाऱ्यांनी या दोन्ही डॉक्टरांना कायद्याचा भंग केल्याचा आरोप केला होता. वाचा- आता समूहात पसरतोय कोरोना, क्लस्टर आउटब्रेकमुळे 1000 लोकं क्वारंटाइन ****मुलाखत दिल्यानंतर अचानक झाल्या गायब डॉ. एई यांनी नुकत्याच एका चीनमधील मासिकाला मुलाखत दिली ज्यामध्ये त्यांनी सरकारच्या कोरोना प्रतिबंधक उपायांवर टीका केली, त्यानंतर त्या गायब झाल्याचे म्हंटले जात आहे. एई यांनी याआधी रुग्णालय व्यवस्थापनाने आपल्या स्तरावर याकडे योग्य लक्ष दिले नाही किंवा चीनी सरकारला योग्यरित्या माहिती दिली नाही. त्यामुळे कोरोना जगभर पसरला, अशी टीका केली होती. वाचा- दहशतवादी हल्ल्यापेक्षा कोरोना घातक, अमेरिकेत 9/11पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू ****अमेरिकेनेही केला चीनवर आरोप अमेरिका आणि इतर देशांनी चीन सरकारवर कोरोनाशी संबंधित माहिती लपवल्याचा आरोप केला आहे. वुहानच्या स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की चीनमध्ये तब्बल 42 हजारवरून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र चीनने केवळ 3200 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकृतरित्या दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







