सर्वात खास मित्र 'चीन'नेच पाकला दिला धोका, इम्रान यांना लावला 32 अब्ज रुपयांचा चुना

सर्वात खास मित्र 'चीन'नेच पाकला दिला धोका, इम्रान यांना लावला 32 अब्ज रुपयांचा चुना

चिनी कंपन्या पाकिस्तानमध्ये 62 अब्ज डॉलर्सच्या खर्चाने चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोअर (CPEC) अंतर्गत मोठ्या प्रमाणात नफा कमावत आहेत.

  • Share this:

इस्लामाबाद, 21 मे : पाकिस्तानने अनेकदा चीनला आपला सर्वात जवळचा मित्र मानले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हाच मित्र भागीदारीच्या नावाखाली पाकचे आर्थिक नुकसान करीत आहे. चिनी कंपन्या पाकिस्तानमध्ये 62 अब्ज डॉलर्सच्या खर्चाने चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोअर (CPEC) अंतर्गत मोठ्या प्रमाणात नफा कमावत आहेत.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी वीजेच्या वाढत्या किमतींबाबत चौकशी करण्यासाठी एक समिती गठीत केली होती, ज्याने आपल्या अहवालात चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडोअर (CPEC) अंतर्गत चीनी कंपन्यांचा भ्रष्टाचार उघडकीस आणला आहे. CPECमधील पारदर्शकतेचा अभाव आणि भ्रष्टाचार यामुळे पाकिस्तानला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. पाकिस्तानच्या 'पॉवर सेक्टर ऑडिट कमिटी, सर्क्युलर डेबट रिझर्वेशन अॅण्ड फ्यूचर रोडमॅप'ने 278 पानांचा रिपोर्ट तयार केला आहे. या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की वीज निर्मिती क्षेत्रात अनियमिततेमुळे 100 अब्ज रुपयांचे नुकसान झाले आहे. यापैकी तोटा एक तृतीयांश चीनी प्रकल्पांमुळे झाला आहे.

वाचा-VIDEO : आठव्या मजल्याच्या बाल्कनीमधून वडिलांनी दिला मुलीला झोका आणि...

पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, समितीने आपल्या रिपोर्टमध्ये खुलासा केला आहे की CPECअंतर्गत हून्ग शेडोंग रुई एनर्जी (HSR) आणि कासिम इलेक्ट्रिक पॉवर कंपनी लिमिटेड कोळसा प्रकल्पांनी आपला खर्च खूपच जास्त दाखवला आहे. समितीच्या अहवालानुसार, चीनमधील कोळशावर आधारीत दोन प्रकल्पांसाठी सुमारे 32.46 अब्ज रुपये (पाकिस्तानी रुपये) च्या अतिरिक्त खर्चास मान्यता दिली.

बांधकाम कंपन्यांच्या रिलीझ दरम्यान चीनी कंपन्यांना 48 महिन्यांसाठी व्याज दरात सूट देण्यात आली होती, परंतु खरं तर प्लॅंटचे संपूर्ण काम 27-29 महिन्यांत पूर्ण झाले. यामुळे कंपन्यांना जादा मोबदला मिळाला. डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाचे 6% वार्षिक अवमूल्यन पाहता हा नफा आणखी वाढतो.

वाचा-एकत्र अ‍ॅडमिट झाले पती, पत्नी आणि मुलगा; पण घरी परतली फक्त आई

चिनी कंपनी HSRने बांधकाम कामादरम्यान दीर्घकालीन कर्ज घेतले होते. दरम्यान, समितीने ज्या दोन प्रकल्पांचा तपास केला आहे, त्यांची सुरुवातीची किंमत 8.8 अब्ज होती. मात्र समितीला असे आढळले की कंपन्यांना अतिरिक्त 483 अब्ज रुपये दिले गेले आहेत, जे सध्याच्या विनिमय दरावर 3 अब्ज डॉलर्स इतके आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, 16 चिनी वीज उत्पादक कंपन्यांनी 60 अब्ज रुपयांची गुंतवणूक केली आणि गेल्या दोन-तीन वर्षात 400 अब्ज रुपयांचा नफा कमावला.

वाचा-फक्त 'या' कारणामुळे नोव्हेंबरपर्यंत भारत होणार कोरोनामुक्त, शास्त्रज्ञांचा अंदाज

First published: May 21, 2020, 10:46 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading