चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांना म्हणाला 'जोकर', झाला 18 वर्षांचा कारावास

चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांना म्हणाला 'जोकर', झाला 18 वर्षांचा कारावास

चीनमध्ये (China) ईशनिंदा म्हणजेच ईश्वरावर तुम्ही टीका करू शकता, मात्र राष्ट्राध्यक्षावर नाही. चीनमधल्या बड्या उद्योगपतीला आता या गुन्ह्यासाठी 18 वर्षं तुरुंगात काढावी लागणार आहेत.

  • Share this:

बीजिंग, 22 सप्टेंबर : चीनमध्ये राष्ट्रीय व्यक्तींवर टीका केल्यास मोठी शिक्षा भोगावी लागते. देशामध्ये राष्ट्रपती आणि महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींवर कुणीही टीका करू शकत नाही.  एका व्यक्तीने राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्यावर केलेल्या टीकेमुळं भयंकर शिक्षा भोगावी लागली आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या एका सदस्याला ही शिक्षा भोगावी लागली आहे. ही व्यक्ती साधीसुधी नव्हे, तर चीनमधली यशस्वी उद्योजक म्हणून प्रसिद्ध आहे. पण आता या बड्या उद्योजकाला 18 वर्षं तुरुंगात काढावी लागणार आहेत.

चीनमध्ये ईशनिंदा म्हणजेच ईश्वरावर तुम्ही टीका करू शकता, मात्र राष्ट्राध्यक्षावर नाही. 69 वर्षीय झिकियांग यांना त्यांनी केलेल्या चुकीबद्दल 18 वर्षांच्या कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. झिकियांग हे  चीनमधील मोठे उद्योगपती आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचे सदस्यही आहेत. त्याचबरोबर एका रिअल इस्टेट कंपनीचे ते अध्यक्ष आहेत. आपल्या विवादित वक्तव्यांमुळं ते नेहमीच चर्चेत असत.

झिकियांग यांनी एका लेखामध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यावर टीका केली होती. टीका करताना त्यांनी राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांना जोकर म्हटलं होतं. मात्र आता त्यांना यासाठी जेलमध्ये जावं लागणार आहे. सत्ताधारी पार्टीच्या या व्यक्तीवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. कोरोना विषाणू संदर्भात त्यांनी राष्ट्रपतींवर आरोप केल्यानंतर एप्रिल महिन्यात त्यांची चौकशी सुरू झाली होती. मार्च महिन्यात त्यांना अटक करण्यात आल्यानंतर जुलै महिन्यात त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. झिकियांग यांनी  राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्यावर कोरोना व्हायरसप्रकरणात हयगय केल्याप्रकरणी टीका केली होती. झिकियांग यांना कोर्टाने शिक्षा सुनावताना पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन आणि राजकीय आदेशांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.

झिकियांग हे सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत.  विवादित कारणांमुळं त्यांच्या सोशल मीडियातील वावरावर 2016 मध्ये बंदी घालण्यात आली होती. तेव्हापासून ते आणखीनच आक्रमक होऊन अनेकदा आपल्या सरकारच्या विरोधात बोलत. मात्र त्यांनी  राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्यावर टीका केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपदेखील लावण्यात आले होते. जनतेच्या पैशाचा दुरुपयोग केल्याचा आरोप देखील त्यांच्यावर करण्यात आला होता.

दरम्यान, झिकियांग यांनी आपल्या पक्षाचा आदेश मानला नसून या शिक्षेविरोधात ते याचिका देखील दाखल करणार नाहीत. त्यामुळे आता त्यांना आयुष्यातील उर्वरित 18 वर्ष जेलमध्ये घालवावी लागणार आहेत.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: September 22, 2020, 7:45 PM IST

ताज्या बातम्या