चीनचा विस्तारवाद चीनने पेंगॉग तलावाच्या परिसरात पुलाचं बांधकाम सुरू केल्याची छायाचित्रे काही दिवसांपूर्वीच समोर आली होती. चीन भारताच्या सीमेजवळील भागात बांधकाम करत असून भारतावरील दबाव वाढवण्याचा सातत्यानं प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच म्हणजेच 1 जानेवारीला भारत आणि चीन या दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांना भेटले होते आणि शुभेच्छा देत मिठाईचं वाटप केलं होतं. मात्र त्यानंतर आता चीननं आपला खरा रंग दाखवायला सुरुवात केली असून अल्पवयीन मुलाचं अपहरण करून आपले इरादे उघड केल्याचं दिसून येत आहे. हे वाचा - चीनकडून प्रतिक्रिया नाही अरुणाचल प्रदेशातील एका खासदारांनी केलेल्या या आरोपांना अद्याप चीनकडून कुठलंच प्रत्युत्तर देण्यात आलेलं नाही. नेमका काय प्रकार घडला आणि या तरुणाचं अपहरण का करण्यात आलं आहे, याचा तपास सध्या स्थानिक पोलीस आणि यंत्रणांनी सुरू केला आहे. मात्र आतापर्यंत सैनिकांपुरता मर्यादित असणारा दोन्ही देशांतला संघर्ष हा सर्वसामान्य माणसांपर्यंत येऊन ठेपल्याचं या घटनेतून दिसून आलं आहे.China's PLA abducted 17-year-old boy from inside Indian territory in Arunachal Pradesh's Upper Siang district, says state's MP Tapir Gao
— Press Trust of India (@PTI_News) January 19, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Border, China, India, India china