बिजिंग, 12 जानेवारी: कोरोनाचे नियम (Corona rules) मोडल्याबद्दल (Break) तिघांना (Three people) 4 वर्षांची शिक्षा (4 year jail) सुनावण्यात आली आहे. चीनमधील न्यायालयानं ही शिक्षा सुनावली असून कोरोनाचे नियम मोडल्याच्या प्रकरणात सुनावलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी शिक्षा असल्याचं मानलं जात आहे. कोरोना संदर्भात चीन सरकारनं घालून दिलेल्या नियमांची कडक अंमलबजावणी केली जात आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरून नियम मोडणाऱ्यांना वचक बसावा, यासाठी ही शिक्षा सुनावण्यात आल्याचं यंत्रणांनी म्हटलं आहे. काय आहे प्रकरण?चीनमधील दलियन बंदरावरील एका कार्गोमध्ये कोरोनाच्या नियमांचा भंग करण्यात आल्याचं प्रकरण पुढं आलं. या कार्गोसाठी काम करणारे कामगार मास्क वापरत नसल्याचं दिसून आलं. कामगारांना मास्क वापरण्यासाठी सक्ती न करणे, कामगारांनी एकमेकांपासून सुरक्षित अंतर न राखणे, कामगारांच्या कोरोना टेस्ट न करताच त्यांना कामावर रुजू करून घेणे, अनेक कामगारांच्या टेस्टचा रिझल्ट येण्यापूर्वीच त्यांना इतर कामागारांसोबत काम करण्याची मुभा देणे यासारखे आरोप कार्गोच्या प्रशासनावर ठेवण्यात आले आहेत. चार वर्षांची शिक्षाया प्रकरणी दलियन बंदरातील संबंधित कार्गोचे व्यवस्थापन पाहणाऱ्या कंपनीचे कंट्रोलर, कायदेशीर प्रतिनिधी आणि निरीक्षक या तिघांवर कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेऊन खटला चालवण्यात आला, अशी बातमी चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेनं दिली आहे. या तिघांना वेगवेगळ्या मुदतीच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली असून कमीत कमी 39 आठवडे ते जास्तीत जास्त 57 आठवड्यांची शिक्षा देण्यात आली आहे.
हे वाचा -
चीनमध्ये चिंतादलियन बंदर हे चीनमधील सर्वात मोठं बंदर असून इथून देशातील 70 टक्के कोल्ड चेन प्रॉडक्ट पाठवली जात असतात. त्यातील एका जरी पदार्थात कोरोना व्हायरचा शिरकाव झाला, तर नागरिकांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या बाबीचं गांभिर्य लक्षात घेऊन हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
Published by:desk news
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.