Home /News /videsh /

कपटी ड्रॅगनची खेळी; कोरोना काळात नेपाळ सीमेवर चीन बनवतोय रस्त्यांचं जाळं

कपटी ड्रॅगनची खेळी; कोरोना काळात नेपाळ सीमेवर चीन बनवतोय रस्त्यांचं जाळं

भारतानं 2020 मध्ये रस्तेनिर्माण केल्यानंतर चीन भारतावर (India China Relations) कुरघोडी करण्यासाठी नेपाळला लागून असलेल्या भागात सामरिक दृष्टीनं वेगानं रस्त्यांचं जाळं तयार करत आहे.

  नवी दिल्ली, 26 मे : भारतानं लिपूलेखपर्यंत 2020 मध्ये रस्तेनिर्माण केल्यानंतर चीन भारतावर (India China Relations) कुरघोडी करण्यासाठी नेपाळला लागून असलेल्या भागात सामरिक दृष्टीनं वेगानं रस्त्यांचं जाळं तयार करत आहे. कोरोना काळात संपूर्ण जगात जीव वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू असताना चीननं मात्र याचा फायदा उचलत विस्तारवादी आणि अतिक्रमणवादी राजकारणाची भूमिका पुढे रेटली आहे. भारताला लागून असलेल्या नेपाळच्या (India Nepal Relations) तींकरपासून साधारण 22 किलोमीटर अंतरापर्यंत आपले रस्ते पोहोचवण्याचं काम चीनकडून वेगाने सुरू आहे. भारताच्या तहसील मुख्यालयापासून 110 किलोमीटर अंतरावर आणि 16 हजार 640 फूट उंचीवर असलेल्या लिपूलेख दर्रा इथं भारत आणि चीन दरम्यानची सीमा निर्धारित केलेली आहे. या दर्ऱ्याला पार करून चीनमध्ये प्रवेश करण्याचा पारंपरिक रस्ता आहे. चीनच्या सीमेला लागून असलेल्या भारतातील व्यास व्हॅली येथील गाव गर्ब्यांगला नेपाळमधील तींकर प्रदेश जोडलेला आहे. नेपाळमधील हिमालयातील उंचावरील गाव तींकरपासून चीन 16 किलोमीटरवर आहे. नेपाळ चीनला विश्वासात घेऊन या भागाचा वापर भारतावर नजर ठेवण्यासाठी करू इच्छित आहे. संरक्षण दलाशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार याच कारणानं चीननं कोरोना काळाचा वापर नेपाळ सीमेपर्यंत रस्त्यांचं जाळं पसरवण्यासाठी केला आहे. तींकरपर्यंत रस्ता आणण्याची चीनची इच्छा सध्याचा रस्तामार्ग तींकरपर्यंत आणण्याची इच्छा आहे. मात्र आतापर्यंत नेपाळने याला सहमती दिलेली नाही. नेपाळमधील सूत्रांच्या माहितीनुसार, या रस्त्याच्या कामासोबतच येथील उंचावरील भागातील गावांनाही रस्तेमार्गानं जोडण्याची मागणी वाढतेय. हे वाचा -Explainer : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या भारतातील स्थलांतरित गावांमध्ये राहतात सहा हजाराहून अधिक लोक चीनच्या सीमेला लागून असलेल्या हिमालयातील उंचावरील गावं नप्लच्यू, गुंजी, रौंगकोंग, नाबी, कुटी इथं सहा हजाराहून अधिक लोक राहतात. या स्थलांतरित गावांमधील लोकांचं सध्या ग्रीष्मकालीन स्थलांतर केलेलं आहे. हेही महत्त्वाचं
  • 8 मे 2020 ला भारताने लिपूलेख येथील रस्तेनिर्माण पूर्ण केलं. तेव्हापासून चीनने सातत्याने सीमेवर भारताला घेण्यासाठी कूटनैतिक प्रयास सुरू केलेत.
  • नेपाळनं भारताच्या 'काळे पाणी' या भागाला आपल्या विवादित नकाशामध्ये समाविष्ट करून नव्या वादाला तोंड फोडलं आहे.
  • आता चीन नेपाळला लागून असलेल्या सीमेवर रस्त्यांचं जाळं तयार करून आपली स्थिती मजबूत करत आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: China, India china, Nepal

  पुढील बातम्या