वुहान 23 मार्च : महाभयंकर कोरोना व्हायरसची सगळ्यात पहिल्यांचा माहिती वुहानच्या डॉ. ली वेनलियांग यांनी दिली होती. नंतर कोरोनामुळेच त्यांचा मृत्यू झाला. स्थानिक पोलिसांनी डॉ. ली यांना अफवा पसरविण्याच्या आरोपांखाली कारवाईचा इशारा दिला होता. त्यामुळे ली यांची माहिती बाहेरच आली नाही आणि त्यांचा मृत्यू झाला. कोरोनाने जेव्हा सगळ्या चीनला व्यापून टाकलं त्यावेळी ली यांच्या विषयीची माहिती बाहेर आली होती. व्हिसलब्लोअर ठरलेल्या ली यांना सर्व जगाने श्रद्धांजली वाहिली. आता सर्व जग कोरोनाने व्यापलं असताना चीन सरकारने ली यांच्या कुटुंबीयांची माफी मागितल्याचं वृत्त ‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिलं आहे.
चीनच्या सत्ताधारी कम्युनिष्ट पक्षाच्या शिस्तपालन समितीने त्यांच्या कुटुंबीयांची माफी मागितली आहे. ली यांनी जी माहिती दिली होती त्याचं गांभीर्य आम्हाला कळालं नाही असं या समितीने म्हटलं आहे. तर ज्या दोन पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना धमी दिली होती त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेतही चीनच्या सरकारने दिले आहेत.
VIDEO 'हे तरी ऐका ...' इटलीत राहणाऱ्या अभिषेक डेरले यांचे अनुभव डोळे उघडतील
फक्त 34 वर्ष वयाचे डॉ. ली हे वुहानच्या एका हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होते. तिथे काही पेशंट उपचारासाठी आले होते. ते सर्व स्थानिक फिश मार्केटमध्ये काम करत होते. त्यांच्यावर उपचार करतांना त्यांना सार्स सारखेच व्हायरस असल्याचं आढळून आलं. त्यांनी त्यांच्या डॉक्टर मित्रांनाही त्याची माहिती सोशल मीडियावरून दिली. तसचं जवळच्यांनाही त्यांनी सावध राहण्यास सांगितलं.
नंतर त्यांनाच तो आजार झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ली यांनी जो इशारा दिला त्यावर वेळीच उपाय योजना केली असती तर सर्व जगाचा धोका टळला असता अशी प्रतिक्रिया आता व्यक्त होतेय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.