तालिबानच्या वर्दक प्रांतातील काही तालिबानी अतिरेक्यांनी काबुलमधील वॉटरसाइड पार्कला भेट देऊन त्या ठिकाणी सुट्टी सेलिब्रेट केली आहे.
अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधील एका पार्कमध्ये तालिबान्यांनी सहल नेली होती. त्यावेळी त्यांनी त्या ठिकाणी पर्यटनाचा आनंद लुटला आहे.
या वेळी त्यांनी कारघामध्येही सरोवराच्या पर्यटनाचा आनंद लुटला. सध्या तालिबान्यांनी देशावर कब्जा केला असून आता त्यांचे अतिरेकी ठिकठिकाणी हौदोस घालत आहेत.
या अतिरेक्यांनी शहरातील ठिकठिकाणी असलेल्या स्टॉल्सवर चहा पिला त्याचबरोबर काही खाद्यपदार्थांची खरेदीही केली आहे.
विशेष म्हणजे या तालिबानी अतिरेकी मनोरंजनासाठी असलेल्या या पार्कमध्ये आत जाण्यासाठी रांगेत उभेही राहिले होते.
तालिबानने जशीजशी झपाट्याने एक एक प्रांत जिंकली तशी तशी त्यांच्या अतिरेक्यांना काबुलला जाण्याचं वेध लागलं होतं. कारण हे लोक याआधी कधीच काबुलला आलेले नव्हते. (फोटो- REUTERS/Jorge Silva)