कॅनडा, 13 जानेवारी: लसीकरण (Vaccination) न झालेल्या ट्रकचालकांनाही (Truck Drivers) सेवा देण्यास कॅनडा सरकारनं (Canada government) परवानगी (Permission) दिली आहे. ट्रकचालकांना लसीकरणाची सक्ती केल्यापासून देशातील जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं चित्र आहे. यावरून देशात तुटवडा निर्माण होत असल्यामुळे आणि विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला लक्ष्य करायला सुरुवात केल्यानंतर अखेर ट्रकचालकांसाठी लसीकरणाचे निकष बदलण्यात आले आहेत.
काय आहेत निकष?
सध्याच्या निकषांनुसार कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या ट्रकचालकांनाच ड्रायव्हिंग करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक ट्रकचालक घरी बसून आहेत. नव्या नियमानुसार आता कॅनडातील ट्रकचालक हे लसीकरणाशिवायही काम करू शकणार आहेत. अमेरिकेत जाणारे आणि अमेरिकेतून परत येणारे ट्रकचालक आता लसीकरण सर्टिफिकेट न दाखवता प्रवास करू शकणार आहेत.
टेस्टही टळली
देशाची सीमा ओलांडताना दरवेळी ट्रकचालकांची कोरोना टेस्ट आणि त्यांचं विलगीकरण हे आधीच्या नियमानुसार सक्तीचं करण्यात आलं होतं. त्यामुळे लसीकरण होऊनही अनेक ट्रकचालकांना सक्तीच्या विलगीकरणात राहावं लागे. त्याचा परिणाम वाहतुकीच्या वेगावर होत होता. नव्या नियमानुसार आता कॅनडाच्या सीमेवर एकाही ट्रक चालकाची कोरोना टेस्ट न कऱण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय ट्रकचालकांना सक्तीचं विलगीकरणही रद्द करण्यात आलं आहे.
अमेरिकी ट्रकचालकांना मात्र जुनेच नियम
कॅनडा सरकारनं बदललेले नियम हे केवळ कॅनडाचे रहिवासी असलेल्या ट्रकचालकांना लागू असणार आहेत. अमेरिकेतून कॅनडात येणाऱ्या अमेरिकी ट्रकचालकांना मात्र जुनेच नियम लागू असतील. त्यांचं लसीकरण पूर्ण झालेलं असणं आणि सक्तीचं क्वारंटाईन या अटी पूर्ण केल्याशिवाय देशात प्रवेश मिळणार नाही. मात्र सीमेपलिकडून येणाऱ्या कॅनडाच्या ड्रायव्हरना मात्र थेट प्रवेश दिला जाणार आहे.
हे वाचा -
अर्थव्यवस्थेवर परिणाम
लॉकडाऊन आणि सीमा बंद असल्यामुळे कॅनडाच्या अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाला होता. जीवनावश्यक वस्तूंचे भाव दुप्पट झाले होते आणि महागाई दरानं गेल्या 20 वर्षातील उच्चांक नोंदवला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Canada, Corona vaccination, Coronavirus, Rules