Home /News /videsh /

ब्रिटनमध्ये दाढी असलेल्या डॉक्टरांना का करू दिली जात नाहीये रुग्णसेवा?

ब्रिटनमध्ये दाढी असलेल्या डॉक्टरांना का करू दिली जात नाहीये रुग्णसेवा?

या योजनेत देशातल्या सर्व नागरिकांच्या आरोग्याची माहिती गोळ करून त्यांना हेल्थ कार्ड देण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्याची आरोग्य योजनेशी सांगड घातली जाणार आहे.

या योजनेत देशातल्या सर्व नागरिकांच्या आरोग्याची माहिती गोळ करून त्यांना हेल्थ कार्ड देण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्याची आरोग्य योजनेशी सांगड घातली जाणार आहे.

ब्रिटनमध्ये (Britain) शीख डॉक्टरांना (Sikh Doctors) त्यांच्या दाढीमुळे (beared) ड्युटीसाठी फिट मानलं जात नाही आहे.

    लंडन, 05 मे : ब्रिटनमध्ये (britain) कोरोनाव्हायरस (coronavirus) रुग्णांची सेवा करण्यासाठी पुढे असलेल्या शीख डॉक्टरांना (sikh doctor) त्यांच्या ड्युटीवरून हटवण्यात आलं आहे आणि याला कारण आहे ते म्हणजे त्यांची दाढी. ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसमध्ये (NHS) काम करणारे हे डॉक्टर कोरोनाव्हायरस रुग्णांच्या उपचारात महत्त्वाची भूमिका बजावत होते, मात्र आता त्यांना कोरोनाव्हायरस वॉर्डची ड्युटी लावली जात नाही आहे. ज्याला या डॉक्टरांनी विरोध केला आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, शीख डॉक्टरांना दाढी असल्याने त्यांना त्यांच्या सामान्य शिफ्ट ड्युटीतून काढण्यात आलं आहे. ब्रिटनच्या शीख डॉक्टर्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 5 डॉक्टरांना त्यांच्या दाढीमुळे कोरोनावायरस वॉर्डमध्ये ड्युटी करण्यापासून रोखण्यात आलं आहे. शीख डॉक्टरांना त्यांच्या दाढीमुळे मानलं जात नाही फिट ब्रिटनमध्ये कोरोनाव्हायरसवर उपचार करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सरकारी गाइडलाइन्स फॉलो कराव्या लागतात. त्यांना पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट आणि फेस मास्क वापरणं गरजेचं आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना दाढी करून येणं आवश्यक आहे, अशी कोणतीही गाइडलाइन नसली तरी एनएचएस हेल्थ वर्कर्सना दाढीच्या केस संक्रमणासाठी कसे कारणीभूत ठरू शकतात हे सांगण्यात आलेलं आहे. हे वाचा - भारतात Corona तिसऱ्या टप्प्यात पोहोचला की नाही? सरकारने दिली महत्त्वाची माहिती शीख डॉक्टरांना ब्रिटनमध्ये कोरोनाव्हायरसच्या रिस्क झोनमध्ये टाकण्यात आलं आहे. तज्ज्ञांच्या मते, शीख डॉक्टरांच्या दाढीमुळे फेस मास्क त्यांच्या चेहऱ्यावर फिट बसत नाही आणि त्यामुळे व्हायरस संक्रमणाचा धोका वाढतो. दाढीवर व्हायरस जास्त वेळ जिवंत राहू शकतो, असे रिपोर्टसही आलेत. दाढीमुळे कोरोना संक्रमणाचा धोका एनएचएस वर्कर्ससाठी वेबसाईटवर लिहिण्यात आलं आहे की, दाढीमुळे पीपीई आणि फेस मास्क वापरण्यात समस्या येते. दाढीमुळे फेस मास्क चेहऱ्याला नीट कव्हर करू शकत नाही, अशात संक्रमणाचा धोका वाढतो. जर स्टाफ दाढी करणार नाहीत तर त्यांना वेगळ्या प्रकारची मेडिकल शिफ्ट लावली जाते. त्यांना नॉन क्लिनिकल विभागात काम मिळू शकतं, मात्र रुग्णांच्या वॉर्डपासून त्यांना दूर ठेवलं जातं. हे वाचा - आधी H1N1 आणि आता COVID-19; 'त्या' राज्यात कोरोनाने स्वाइन फ्लूलाही मागे टाकलं शीख डॉक्टरांच्या या समस्येबाबत वेबसाईटवर माहिती देण्यात आली आहे की, धार्मिक कारणांमुळे ते आपली दाढी काढून टाकू शकत नाही. त्यामुळे आता वेगळ्या प्रकारचे पीपीई आणि फेस मास्क उपलब्ध करून देण्याबाबत विचार सुरू आहे. दरम्यान अशाच समस्येचा सामना दाढी ठेवणाऱ्या मुस्लिम डॉक्टरांनाही करावा लागतो आहे. संकलन, संपादन - प्रिया लाड
    Published by:Priya Lad
    First published:

    पुढील बातम्या