Home /News /coronavirus-latest-news /

स्वाइन फ्लूनं घातलं थैमान त्याच राज्यात कोरोनाचा कहर, H1N1 ला COVID-19 ने मागे टाकलं

स्वाइन फ्लूनं घातलं थैमान त्याच राज्यात कोरोनाचा कहर, H1N1 ला COVID-19 ने मागे टाकलं

ज्या राज्यांमध्ये SWINE FLU ची प्रकरणं होती त्याच राज्यांमध्ये CORONAVIRUS चीही सर्वाधिक प्रकरणं आहेत.

    नवी दिल्ली, 05 मे : भारतात (india) आतापर्यंत कोरोनाव्हायसची (coronavirus) एकूण 46433 प्रकरणं आहेत. सोमवारपर्यंत आढळलेल्या एकूण प्रकरणांपैकी महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, दिल्ली आणि तामिळनाडू या राज्यात 70% प्रकरणं आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्रालयाच्या आकडेवारीनुसार याच राज्यांमध्ये 2015 पासून याच राज्यात स्वाईन फ्लूची (swine flu) प्रकरण आहेत. द हिंदूनं याबाबत वृत्त दिलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या National Centre for Disease Control (NCDC) च्या आकडेवारीनुसार, भारतात 2010 साली स्वाइन फ्लूनं पाय रोवले त्यावेळी महाराष्ट्र (6,814) , दिल्ली (2,725)  आणि कर्नाटक ( 2,575) या राज्यांमध्ये सर्वात जास्त प्रकरणं होती. 2015 साली देशात स्वाइन फ्लूचा उद्रेक झाला. त्यावेळी महाराष्ट्र, राजस्थान आणि दिल्लीत देशातील एकूण स्वाइन फ्लू प्रकरणांपैकी 42,592 म्हणजे  63% प्रकरणं होती. त्यानंतर 2016 साली स्वाइन फ्लूचा आकडा कमी झाला तरी सर्वाधिक प्रकरणं असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र आणि गुजरातचा समावेश होता. त्यानंतर 2018 साली तामिळनाडू, महाराष्ट्र, राजस्थान आणि गुजरामथ्ये 65% तर 2019 साली राजस्थान, गुजरात, दिल्ली आणि महाराष्ट्रात स्वाइन फ्लूची  15,580 म्हणजे 54 % स्वाइन प्रकरणांची नोंद झाली. हे वाचा - बापरे! देशात 24 तासांत सर्वात जास्त 3900 नवे रुग्ण आणि 195 जणांचा मृत्यू स्वाइन फ्लू आणि कोरोनाव्हायरसचं प्रमाण पाहता कोरोनाव्हायरसनं स्वाइन फ्लूलाही मागे टाकल्याचं दिसतं आहे. ज्या राज्यांमध्ये स्वाइन फ्लूची प्रकरणं होती त्याच राज्यांमध्ये कोरोनाव्हायरसचीही सर्वाधिक प्रकरणं आहेत. द हिंदूशी बोलताना एनसीडीची संचालक सुजीत कुमार सिंह म्हणाले, "ज्या राज्यांमध्ये कोरोनाव्हायरसची सर्वात जास्त प्रकरणं होती, त्याच राज्यांमध्ये कोरोनाव्हायरसचीही प्रकरणं जास्त असल्याचं आम्हाला दिसून आलं आहे. आपण सध्या महासाथीच्या मध्यस्थितीत आहोत Sars-CoV2 हा H1N1 ची जागा घेतो आहे की काय, हे आता सांगणं शक्य नाही" हे वाचा - हायड्रोक्लोरोक्विन की रेमडेसिवीर... कोणतं औषध कोरोनावर प्रभावी? H1N1 आणि Sars-CoV2 हे दोन्ही व्हायरस श्वसनप्रमाणालीवर हल्ला करत असले तरी त्यांच्यामध्ये वेगळेपणा आहे. हे दोन्ही व्हायरस वेगळ्या प्रकारचे आहेत. स्वाइन फ्लूमुळे लहान मुलं आणि 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींचाही मृत्यू होतो. तर कोरोनाव्हायरसमुळे 60 पेक्षा जास्त वयांच्या लोकांसाठी जास्त धोकादायक  आहे, शिवाय लहान मुलांवर त्याचा फारसा परिणाम दिसून येत नाही. संकलन, संपादन - प्रिया लाड
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Swine flu in india

    पुढील बातम्या