मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

सुनक यांच्या आई-वडिलांची प्रार्थना वैष्णोदेवीने ऐकली! निवडणुकीपूर्वीचा तो फोटो व्हायरल

सुनक यांच्या आई-वडिलांची प्रार्थना वैष्णोदेवीने ऐकली! निवडणुकीपूर्वीचा तो फोटो व्हायरल

सुनक यांच्या आई-वडिलांची प्रार्थना वैष्णोदेवीने ऐकली!

सुनक यांच्या आई-वडिलांची प्रार्थना वैष्णोदेवीने ऐकली!

ऋषी सुनक पंतप्रधान झाल्यानंतर माता वैष्णोदेवीच्या दरबारात आलेल्या त्यांच्या पालकांचा फोटो व्हायरल होत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : ब्रिटनचे नवनिर्वाचित पंतप्रधान ऋषी सुनक यांचे आई-वडील त्यांच्या निवडणूक प्रचारापूर्वी माता वैष्णोदेवीच्या दरबारात आले होते. 12 जुलै रोजी त्यांचा निवडणूक प्रचार सुरू झाला. मात्र, त्याआधी जून 2022 मध्ये सुनक यांचे पालक वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी आले होते. वडील यशवीर सुनक आणि आई उषा सुनक यांनी आईच्या दरबारात उपस्थित राहून मुलाच्या यशासाठी प्रार्थना केली होती.

सुनक पंतप्रधान झाल्यानंतर माता वैष्णोदेवीच्या दरबारात आलेल्या त्याच्या आई-वडिलांचा फोटो माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाचे सीईओ आशुल गर्ग यांनी शेअर केला आहे. तो आता व्हायरल होत आहे. फोटोत सुनक यांचे पालक सीईओ आशुल गर्ग यांच्यासोबत उभे आहेत. वास्तविक, सुनक यांच्या वडिलांचा जन्म केनियामध्ये झाला होता. सध्या ते साउथॅम्प्टनमध्ये राहतात. ते जनरल प्रॅक्टिशनर आहेत, तर आई उषा सुनक स्वतःची फार्मसी चालवतात. आशुल गर्ग यांनी न्यूज18 ला सांगितले की, जून 2022 मध्ये सुनक यांचे आई-वडील वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी आले होते.

वाचा - वयाच्या 20 व्या वर्षी ऋषी सुनक होते कोट्यधीश; पत्नीच्या नावे आहे एवढी संपत्ती

ऋषी सुनक यांचे भारताबरोबरच पाकिस्तानशीही नाते

सुनक यांच्या आजी-आजोबांचा जन्म ब्रिटीश-शासित भारतात झाला होता. मात्र, त्यांचे जन्मस्थान पाकिस्तानच्या आधुनिक पंजाब प्रांतातील गुजरांवाला येथे आहे. अशा प्रकारे नवीन पंतप्रधान भारतीय आणि पाकिस्तानी दोन्ही आहे. क्वीन लायन्स 86 या ट्विटर हँडलने ट्विट केले की, 'सनक गुजरांवाला यांचे पंजाबी खत्री कुटुंब आहे, जे आता पाकिस्तानमध्ये आहे. ऋषी यांचे आजोबा रामदास सुनक यांनी 1935 मध्ये नैरोबीमध्ये लिपिकाच्या नोकरीसाठी गुजरांवाला सोडले. कौटुंबिक माहिती देणार्‍या क्वीन लायन्स 86 नुसार, रामदास यांची पत्नी, सुहाग राणी सुनक, 1937 मध्ये केनियाला जाण्यापूर्वी गुजरांवाला येथून त्यांच्या सासूसोबत दिल्लीला गेल्या होत्या. ऋषी यांचा जन्म 1980 मध्ये साउथम्प्टनमध्ये झाला.

सर्वप्रथम बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा दिला, त्यानंतर निवडणुकीत ऋषी सुनक यांचा पराभव करून लिझ ट्रस खुर्चीवर बसल्या. मात्र, त्यांनाही फार काळ सत्ता मिळाली नाही आणि 45 दिवसांत राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर पुन्हा एकदा ऋषी सुनक या शर्यतीत सामील झाले आणि यावेळी त्यांना विजय मिळाला. ऋषी सुनक यांचा भारतासाठी हा विजय दिवाळीच्या भेटीपेक्षा कमी नाही.

First published:

Tags: Britain, London