जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / आधी पंतप्रधानपद गेलं, आता खासदारकीचा राजीनामा; जॉन्सन यांच्यावर का आली अशी वेळ?

आधी पंतप्रधानपद गेलं, आता खासदारकीचा राजीनामा; जॉन्सन यांच्यावर का आली अशी वेळ?

बोरिस जॉन्सन यांचा खासदारकीचा राजीनामा

बोरिस जॉन्सन यांचा खासदारकीचा राजीनामा

ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर आता खासदारकीचासुद्धा राजीनामा देण्याची वेळ आलीय.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

लंडन, 10 जून : ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर आता खासदारकीचासुद्धा राजीनामा देण्याची वेळ आलीय. पंतप्रधानपद गेल्यानंतर आता त्यांना संसदेच्या सदस्यत्वाचा राजीनामाही द्यावा लागलाय. पार्टीगेट प्रकरण त्यांना भोवलं आहे. नुकतंच एका संसदीय समितीने म्हटलं होतं की, लॉकडाऊनच्या काळात डाउनिंग स्ट्रीटवर पार्टीचे आयोजन केले जात होते आणि ते स्पष्टपणे लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन होते. पण जॉन्सन यांनी या प्रकरणी संसदेची दिशाभूल केली होती. त्यांनी हाऊस ऑफ कॉमन्सला सतत लॉकडाऊनचे पालन केले जात असल्याचं सांगितलं. आता या प्रकरणी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. बोरिस जॉन्सन यांच्याविरोधात संसदीय समिती चौकशी करत होती. त्यांनी कोरोना काळात डाउनिंग स्ट्रिटवर लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करून पार्टी केली. याप्रकरणी त्यांनी हाउस ऑफ कॉमन्सची दिशाभूल केली का याची चौकशी केली जात होती. संसदेच्या नेतृत्वाखाली विशेषाधिकार समितीकडून बोरिस जॉन्सन यांना एक गोपनीय पत्रही मिळालं आहे. त्यानंतरच जॉन्सन यांनी राजीनामा दिला आहे. गुजरात ATSची मोठी कारवाई, ISIS मॉड्युलचा पर्दाफाश; महिलेसह चौघांना अटक   जॉन्सन यांनी संसदेवर आरोप केला असून मला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असल्याचं म्हटलंय. त्यांनी एकही पुरावा सादर केला नाही. त्यांच्याकडे असं काहीच नाही की मी जाणीवपूर्वक किंवा बेजबाबदारपणे संसदेची दिशाभूल केली होती. सध्या संसद सोडत आहे असं म्हणत जॉन्सन यांनी पुन्हा येण्याचे संकेत दिलेत. तसंच मुठभर लोकांकडून मला राजीनामा देण्यास भाग पाडलं जात आहे. त्यांच्या दाव्यात काहीच तथ्य नाही असं म्हणत पार्टीगेट प्रकरणी करण्यात आलेले आरोप फेटाळले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात