जाहिरात
मराठी बातम्या / देश / गुजरात ATSची मोठी कारवाई, ISIS मॉड्युलचा पर्दाफाश; महिलेसह चौघांना अटक

गुजरात ATSची मोठी कारवाई, ISIS मॉड्युलचा पर्दाफाश; महिलेसह चौघांना अटक

गुजरात ATSची मोठी कारवाई, ISIS मॉड्युलचा पर्दाफाश; महिलेसह चौघांना अटक

एटीएसने माहिती देताना म्हटलं की, या प्रकरणी सूरतमधील सुमेरा नावाच्या महिलेला अटक केली आहे. अटक करण्यात आलेले चौघेही ISISच्या सक्रीय ग्रुपचे सदस्य आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

गांधीनगर, 10 जून : गुजरात एटीएसने दहशतवादी संघटना आयएसआयएसच्या एका मॉड्युलचा पर्दाफाश केला. एटीएसने एका महिलेस चौघांना पोरबंदरमधून अटक केली. तर एकाला ताब्यात घेण्यासाठी छापे टाकले जात आहेत. एटीएसने माहिती देताना म्हटलं की, या प्रकरणी सूरतमधील सुमेरा नावाच्या महिलेला अटक केली आहे. अटक करण्यात आलेले चौघेही ISISच्या सक्रीय ग्रुपचे सदस्य आहेत. गुजरात एटीएसला छाप्यामध्ये बंदी असलेल्या अनेक गोष्टी आढळून आल्या. चौघेही आयएसआयएससोबत काम करण्यासाठी पळून जाण्याच्या तयारीत होते. सर्वजण एक वर्षापासून एकमेकांच्या संपर्कात होते. राष्ट्रीय तपास संस्थेने नुकतंच मध्य प्रदेशातून तीन लोकांना अटक केली होती. त्यांचेही कनेक्शन आयएसआयएसशी होते अशी माहिती समोर आली होती. तपास संस्था एनआयएने मध्य प्रदेश पोलिसांच्या एटीएससोबत मिळून गुप्तचर विभागाच्या नेतृत्वाखाली एक संयुक्त मोहिम राबवली होती. जबलपूरमध्ये 13 ठिकाणांवर छापा टाकला होता. या छाप्यात तिघांना अटक केली होती. त्यांची नावे सय्यद ममूर अली, मोहम्मद आदिल खान, मोहम्मद शाहिद अशी होती. CRPF, BSF जवानांच्या परेडला लवकरच वाजणार भारतीय धून, इंग्रज राजवटीच्या परंपरा होणार इतिहासजमा   एनआयएने छाप्यात धारदार शस्त्रे, दारुगोळा, आक्षेपार्ह कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे जप्त केली होती. एनआयएने 24 मे रोजी मोहम्मद खानच्या आयएसआयएस समर्थक हालचालींच्या तपासावेळी एक गुन्हा दाखल गेला होता. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात एजन्सीला याबाबत माहिती मिळाली होती. एनआयएला अशी माहिती समजलीय की, आयएसआयएसच्या इशाऱ्यावर भारतात दहशतवादी हल्ला करण्यासाठी यांच्याकडून सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. हे मॉड्युल स्थानिक मशिदी आणि घरांमध्ये बैठका घेते आणि देशात दहशत पसरवण्याचा कट रचते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gujrat
  • First Published :
जाहिरात
जाहिरात