मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

हनीमूनला जोडप्यासोबत झोपते वधूची आई, विचित्र प्रथा ऐकून फिरेल डोकं

हनीमूनला जोडप्यासोबत झोपते वधूची आई, विचित्र प्रथा ऐकून फिरेल डोकं

हनीमूनबाबत प्रत्येक देशाच्या संस्कृतीत वेगवेगळ्या (Brides mother sleeps with couple on the night of honeymoon) प्रथा पाळल्या जातात.

हनीमूनबाबत प्रत्येक देशाच्या संस्कृतीत वेगवेगळ्या (Brides mother sleeps with couple on the night of honeymoon) प्रथा पाळल्या जातात.

हनीमूनबाबत प्रत्येक देशाच्या संस्कृतीत वेगवेगळ्या (Brides mother sleeps with couple on the night of honeymoon) प्रथा पाळल्या जातात.

  • Published by:  desk news

हनीमूनबाबत प्रत्येक देशाच्या संस्कृतीत वेगवेगळ्या (Brides mother sleeps with couple on the night of honeymoon) प्रथा पाळल्या जातात. काही भागात लग्नाच्या आधीच पती आणि पत्नीनं शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याला परवानगी देण्यात येते, तर काही ठिकाणी (Strange tradition regarding honeymoon) लग्नानंतर निर्माण झालेले शारीरिक संबंध हेच पवित्र मानले जातात. एका देशात मात्र या सगळ्यापेक्षा अनोखी परंपरा पाळली जाते. या देशात लग्नाच्या पहिल्या रात्री म्हणजेच हनीमूनला वधूची आई ही कपलसोबत बेडरूममध्ये झोपते.

अशी आहे प्रथा

अफ्रिकेतील काही गावांमध्ये हनीमूनच्या रात्री जोडप्यासोबत वधूच्या आईने झोपण्याची प्रथा पाळली जाते. उडीसा पोस्ट नावाच्या बेवसाईटने दिलेल्या बातमीनुसार या प्रथेमागे एक वेगळा विचार असल्याचं सांगितलं जातं. लग्नानंतर नवरा आणि बायकोला देण्यात येणारं हे एक प्रकारचं सेक्स एज्युकेशन असल्याचं सांगितलं जातं.

अनेकांना वाटतो विचित्रपणा

भारतात अनेक घरांमध्ये लग्नाच्या रात्री वधू आणि वरांना चिडवलं जातं. घरातील पाहुणे मंडळी, भावंडं आणि मित्रमंडळी हनीमूनवरून अनेकदा थट्टामस्करी करताना दिसतात. मात्र हनीमून हा दोघांचा खासगी मामला मानला जातो. हनीमून ही लग्न झालेल्या जोडप्याला एकांत मिळण्यासाठीची प्रक्रिया मानली जाते आणि दोघांना एकांतात सोडलं जातं. अफ्रिकेत मात्र याच्या नेमकी उलटी पद्धत काही गावात आहे.

हे वाचा- भेसळयुक्त, बनावट दूध आरोग्यासाठी आहे खूप घातक; या टिप्स वापरून लगेच ओळखाल भेसळ

पहिल्या रात्री मार्गदर्शन

लग्नाच्या पहिल्या रात्री वधूची आई वधू आणि वराला मार्गदर्शन करते. हनीमून कसा साजरा करावा, याची शास्त्रोक्त माहिती देण्याचं काम वधूची आई करते. काही ठिकाणी वधूची आई नसेल, तर घऱातील एखादी ज्येष्ठ महिला ही जबाबदारी घेते आणि पूर्ण रात्र त्या जोडप्यासोबत घालवते. दुसऱ्या दिवशी त्या जोडप्याचं कामजीवन योग्य प्रकारे सुरू झालं की नाही, याची इत्यंभूत माहिती ही महिला इतर नातेवाईकांना देते आणि त्यानंतर या बाबीचंही सेलिब्रेशन केलं जातं. ही प्रथा ऐकताना अऩेकांना विचित्र वाटतं, मात्र पहिल्यापासून सवय असल्याने अफ्रिकेत आजही ही प्रथा पाळली जाते.

First published:

Tags: Africa, Marriage, Wife and husband