मुंबई, 08 नोव्हेंबर : दूध ही अशी वस्तू आहे, जी प्रत्येक घराची गरज आहे. सर्वजण दूध पितात. मग ती मुले असोत, वृद्ध असोत किंवा घरातील इतर कोणत्याही वयाचा व्यक्ती असो. सर्वांसाठी गरजेच्या आणि मोठी मागणी असलेल्या दुधात भेसळ (Milk adulteration) केली जाते याविषयी तुम्ही ऐकले असेल. भेसळयुक्त दूध खाल्ल्याने आपण सगळेच अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांना बळी पडू शकतो. त्यामुळे खरे आणि भेसळयुक्त दूध ओळखता येणं महत्त्वाचं आहे. दुधात पाणी घालण्यासोबतच 10 पेक्षा जास्त वेगवेगळ्या गोष्टी मिसळून सिंथेटिक दूध तयार केलं जातं. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FASSI) च्या अहवालात अनेकदा याचा खुलासा झाला आहे.
बनावट दूध कसं तयार केलं जातं?
तज्ज्ञांच्या मते, पाण्यात दूध पावडर मिसळूनही बनावट दूध तयार केले जाते, ज्यामध्ये लोणी नसते. स्निग्धता दिसून येण्यासाठी रिफाइंड तेल आणि शॅम्पूचा वापर केला जातो. दूध पांढरे दिसण्यासाठी वॉशिंग पावडर आणि पांढरा रंग (सफेडा) मिसळला जातो. दुधात गोडवा आणण्यासाठी ग्लुकोज टाकले जाते. अशा प्रकारे बनावट दूध तयार केलं जातं.
बनावट दूध कसं ओळखावं
1. सिंथेटिक दूध कसं ओळखावं?
सिंथेटिक दुधाची चव कडू लागते.
बोटांच्या दरम्यान चोळले की ते साबणासारखे स्निग्धपणासारखे वाटते.
गरम झाल्यावर ते पिवळे होते.
हे वाचा - शारीरिक संबंधांदरम्यान आला हार्टअटॅक, एका चुकीमुळे गेला असता महिलेचा जीव
2. पाण्याची भेसळ कशी ओळखायची?
दुधाचा थेंब एका गुळगुळीत पृष्ठभागावर टाका.
जर थेंब हळू वाहत असेल आणि टाकलेल्या ठिकाणी पांढरा डाग राहत असेल तर ते शुद्ध दूध आहे.
भेसळयुक्त दुधाचा एक थेंब कोणताही डाग न राहता त्वरीत वाहतो.
3. स्टार्चची चाचणी कशी करावी?
दुधात आयोडीनचे काही थेंब घाला.
मिक्स केल्यावर मिश्रणाचा रंग निळा होईल.
4. दुधात डिटर्जंटची भेसळ
टेस्ट ट्यूबमध्ये 5-10 मिलीग्राम दूध घ्या आणि जोरात हलवा.
जर त्यात फेस तयार होऊ लागला, तर याचा अर्थ असा की त्यात डिटर्जंटची भेसळ झाली आहे.
हे वाचा - IndiGo Recruitment: इंडिगो एअरलाईन्समध्ये इंजिनिअर्ससाठी होणार पदभरती; अशा पद्धतीनं करा अप्लाय
मुले आणि गर्भवती महिलांना सर्वात जास्त धोका
सतत सिंथेटिक दूध प्यायल्याने कर्करोग होऊ शकतो, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दुधात कॅल्शियम असते, पण सिंथेटिक दूध बनवल्यास त्याची प्रतिक्रिया उलट होऊ शकते. यामुळे हाडांनाही त्रास होऊ शकतो, तर केमिकलमुळे आतडे, यकृत खराब होईल. विशेषत: लहान मुले आणि गरोदर महिलांवर सर्वाधिक दुष्परिणाम होतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips