मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

8 बायका आणि फजिती ऐका! एकाच वेळी सर्वांना सांभळताना नवऱ्याच्या नाकीनऊ

8 बायका आणि फजिती ऐका! एकाच वेळी सर्वांना सांभळताना नवऱ्याच्या नाकीनऊ

  एक बायको सांभाळण्यासाठी मोठी कसरत करावी लागते असं अनेक पुरुष गमतीनं म्हणतात. पण हा तर थेट एकावेळी 8 बायकांसोबत संसार करत आहे.

एक बायको सांभाळण्यासाठी मोठी कसरत करावी लागते असं अनेक पुरुष गमतीनं म्हणतात. पण हा तर थेट एकावेळी 8 बायकांसोबत संसार करत आहे.

एक बायको सांभाळण्यासाठी मोठी कसरत करावी लागते असं अनेक पुरुष गमतीनं म्हणतात. पण हा तर थेट एकावेळी 8 बायकांसोबत संसार करत आहे.

    मुंबई, 30 जून :  एक बायको सांभाळण्यासाठी मोठी कसरत करावी लागते असं अनेक पुरुष गमतीनं म्हणतात; पण ब्राझीलमध्ये (Brazil) तर एका व्यक्तीनं एकाच कार्यक्रमात नऊ बायकांशी लग्न केलं. लग्न करताना या गोष्टीची इतकी चर्चा होईल, याची त्याला कल्पना नसावी. ब्राझीलमधील एक मॉडेल आणि प्रभावी व्यक्ती आर्थर ओ उर्सा (Arthur O Ursa) यानं एका दिवशी नऊ स्त्रियांशी लग्न केलं. याची खूप चर्चाही झाली. मात्र त्यानंतर एका पत्नीला घटस्फोट दिला. या सगळ्या पत्नींना सांभाळणं कठीण गोष्ट असल्याचं आता तो म्हणतोय. ब्राझीलचा मॉडेल आर्थरच्या नऊ लग्नांची चर्चा गाजली होती. त्यानंतर त्याच्या एका पत्नीनं सवतींसोबत नवऱ्याला वाटून घेणं आवडत नसल्याचं कारण देऊन घटस्फोट घेतला. काही दिवसांपूर्वी आर्थर एका शॉपिंग मॉलमध्ये खरेदी करण्यासाठी आला होता. आठ पत्नींना गिफ्ट घेण्यासाठी तो आला होता. ब्राझिलियन व्हॅलेंटाइन्स डेसाठी (Valentine’s Day) ही गिफ्ट्स तो घेत होता. 12 जूनला तिथे व्हॅलेंटाइन्स डे साजरा केला जातो. लग्नानंतर काहीच महिन्यांत एका पत्नीपासून घटस्फोट घेतल्यामुळे आर्थर लग्नाबाबत खूप सतर्क झाला. त्यानं सगळ्या पत्नींसाठी एकसारखी गिफ्ट घेतली. मात्र त्यासाठी त्यानं तब्बल साडेआठ लाख रुपये खर्च केले. खास दिवसासाठी त्यानं त्याच्या पत्नींना खास गिफ्ट्स घेतली होती. सगळ्या बायकांमध्ये गिफ्टवरून भांडण होऊ नये, यासाठी त्यानं एकसारखी गिफ्ट्स घेतली. त्याच्या सहा पत्नी या खरेदीवेळी त्याच्यासोबत होत्या. आर्थरच्या म्हणण्यानुसार, इतक्या बायकांसोबत एकत्र संसार करणं सोपं नाही. मात्र, याबाबत आपण कोणालाही काही जाणवू देत नसल्याचं तो म्हणतो. सगळ्यांना काही कमी पडू नये यासाठी भरपूर पैसे तो कमवतो. मात्र काही खरेदी करताना ते एकसारखंच असेल, हे पाहतो. एकीला घटस्फोट दिल्यानंतर इतरांना खूश ठेवण्यासाठी तो धडपडतो आहे. त्यांच्याबाबत इतकी चर्चा होईल, याची आर्थर आणि त्याच्या पत्नींना कल्पना नव्हती. आता तो खरेदीला गेला तरी त्याची चर्चा होते. अभिनेत्रीला सर्जरी करणं पडलं होतं महागात; चेहरा तर बिघडलाच पण नोकरीही गेली लग्न हा काही एका दिवसाचा कार्यक्रम नसतो. आयुष्यभर एकमेकांना सोबत करण्याची जबाबदारी असते. त्याची कल्पना काहींना नसते. काही आनंदानं तडजोडी स्वीकारतात. ब्राझिलियन मॉडेल आर्थरच्या नऊ लग्नांपैकी एक लग्न मोडलं, मात्र इतर आठही पत्नींना सांभाळण्यासाठी त्याला तारेवरची कसरत करावी लागते आहे.अर्थात ही ब्राझीलमधल्या आर्थरची गोष्ट असली तरीही जगभर थोड्याफार फरकाने परिस्थिती तीच असते. त्यामुळे पती-पत्नी दोघांनी सांभाळून घेतलं तरच लग्नाचं नातं टिकतं.
    First published:

    Tags: Brazil, Marriage

    पुढील बातम्या