मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Online Challenge मुळे अल्पवयीन मुलीचा मृत्यू, या देशानेही केली 'टिक टॉक'वर कारवाई

Online Challenge मुळे अल्पवयीन मुलीचा मृत्यू, या देशानेही केली 'टिक टॉक'वर कारवाई

टिक टॉक (TikTok) वरील कथित ब्लॅकआऊट चॅलेंज (Blackout Challenge) खेळताना दहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

टिक टॉक (TikTok) वरील कथित ब्लॅकआऊट चॅलेंज (Blackout Challenge) खेळताना दहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

टिक टॉक (TikTok) वरील कथित ब्लॅकआऊट चॅलेंज (Blackout Challenge) खेळताना दहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

    रोम, 23 जानेवारी :  इंटरनेटवरील वेगवेगळ्या 'ऑनलाईन चॅलेंज'मध्ये भाग घेऊन वेळ, शिक्षण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जीव याची पर्वा न करणाऱ्या तरुणाईची संख्या कमी नाही. अगदी भारतामध्येही यापूर्वी अशा प्रकारच्या ऑनलाईन चॅलेंजमध्ये काही जणांनी जीव गमावला आहे. चायनीज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिक टॉक (Tik Tok) वर भारत सरकारनं सध्या बंदी घातली आहे. मात्र जगातील अनेक देशांमध्ये टिक टॉक सुरु आहे. 'टिक टॉक'च्या गैरव्यहाराचं एक ताजं उदाहरण इटलीमध्ये  (Italy) उघड झालं आहे. 'टिक टॉक' वरील कथित ब्लॅकआऊट चॅलेंज (Blackout Challenge) खेळताना दहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्यानं इटलीमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची इटली सरकारनं तातडीनं दखल घेतली असून 'टिक टॉक'वर कारवाई केली आहे. बाथरुमध्ये सापडली मुलगी या दुर्दैवी प्रकारातील मृत मुलगी तिच्या बाथरुमध्ये मोबाईल फोनसह बेशुद्ध अवस्थेत सापडली होती. तिच्या पाच वर्षांच्या बहिनीनं तिला बेशुद्ध पाहिलं. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये उपचाराच्या दरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी तिचा मोबाईल जप्त केला असून पुढील तपास सुरु केला आहे. हे ही वाचा -मुंबई : Gold Loanच्या नावाने सुरू होता Fraud; सोनारही ओळखू शकला नाही बोगस सोनं आई-वडिलांना धक्का! आपली मुलगी 'टिक टॉक'वर अशा प्रकारच्या कोणत्या चॅलेंजमध्ये सहभागी झाली आहे, हे तिच्या आई-वडिलांना माहिती नव्हते. त्यांच्या लहान मुलीनं हा सर्व प्रकार सांगितल्यानंतर त्यांना धक्का बसला आहे. “ती 'टिक टॉक'वर डान्स व्हिडीओ (Dance Video) पाहते इतकचं आपल्याला माहिती होतं. ती असं काही करेल हे कधीही वाटलं नाही,’’ अशी प्रतिक्रिया त्यांनी इटालीतील एका वृत्तपत्राला दिली आहे. लोकांच्या रोषानंतर सरकारला जाग ही घटना उघड होताच इटलीमध्ये संतापाचं वातावरण आहे. अनेकांनी सोशल नेटवर्कवर (Social Network) कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. इटलीतील चाईल्ड प्रोटेक्शन कमिशनच्या अध्यक्षांनी देखील या प्रकरणात सरकारनं कारवाई करण्याची मागणी केली होती. लोकांच्या वाढत्या विरोधानंतर इटली सरकारनं 'टिक टॉक'वर कारवाई केली आहे. ज्या युझर्सच्या वयाची अधिकृत पडताळणी झालेली नाही, त्यांना 'टिक टॉक' वापरण्यास बंदी घालण्याचा निर्णय इटली सरकारनं घेतला आहे. सरकारनं या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देखील दिले आहेत. त्याचवेळी सध्या 15 फेब्रुवारीपर्यंत सरकारनं ही बंदीची कारवाई केली आहे. चौकशी अहवाल आल्यानंतर ही कारवाई आणखी व्यापक केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान या प्रकरणात सर्व प्रकारचं सहकार्य करण्याचं आश्वासन 'टिक टॉक'ची पालक कंपनी असलेल्या 'बाईटडान्स'नं (ByteDance) दिलं आहे. त्याचबरोबर आपल्या प्लॅटफॉर्मवर या प्रकारच्या चॅलेंजचा कोणताही कंटेट आढळला नसल्याचा दावा कंपनीनं केला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Tik tok

    पुढील बातम्या