मुंबई : Gold Loan च्या नावाने सुरू होता Fraud; सोनारही ओळखू शकला नाही बोगस सोनं

मुंबई : Gold Loan च्या नावाने सुरू होता Fraud; सोनारही ओळखू शकला नाही बोगस सोनं

मुंबई आणि परिसरात आरोपींनी आतापर्यंत 40 हून अधिक गुन्हे केले आहेत.

  • Share this:

मुंबई, 23 जानेवारी : मुंबईतील ज्वेलर्सला नकली सोनं दाखवून खऱ्या सोन्याची किंमत घेऊन फसवणूक करणाऱ्या तीन महिलांसह एका पुरुषाला दहिसर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी सांगितलं की, 20 जानेवारी 2021 रोजी महेंद्र बाफना नावाच्या तक्रारकर्त्याने दहिसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. यानुसार त्याच्या ज्वेलर्सच्या दुकानात एका महिला सोन्याची चैन घेऊन आली होती, आणि पैसे हवे असल्याने कर्जाऊ ठेवणार असल्याचं सांगितलं. जेव्हा ज्वेलस्रचे महिलेकडून बिल मागितलं तेव्हा हे सोन गिफ्टमध्ये आल्याचं सांगितलं. त्यामुळे याचा बिल नाही. पोलिसांनी सांगितलं की, महिला जी सोनं घेऊन आली होती, ते सोनं नकली होतं, मात्र त्याची करागिरी अशी होती की सोनारदेखील ते ओळखू शकला नाही.

हे ही वाचा-मध्यरात्री चेक करीत होता ईमेल; INBOX मध्ये जे पाहिलं त्यामुळे झोपूच शकला नाही

दहिसर पोलिसांनी या प्रकरणात सलमा फहीम काझी-वय 38 वर्ष, गुड़िया झहुर खान- वय 24 वर्ष, सलमा मेहताब बेग-वय 38वर्ष, हरिश्चंद्र भोलानाथ सोनी- वय 45 यांना अटक केली आहे. हे सर्व नालासोपारा येथील राहणारे आहेत. ताब्यात घेण्यात आलेले आरोपी ज्या भागातील ज्वेलर्सची फसवणूक करीत होते ते त्या भागात राहत असल्याचं सांगतं. या आरोपींविरोधात मीरारोड, नालासोपारा, सांताक्रुज आणि दहिसर सह मुंबई आणि परिसरात 40 हून अधिक प्रकरणं समोर आली आहेत. अखेर त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी यांच्याकडून 65 ग्रॅम बोगस सोनं काही कॅश सापडली आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: January 23, 2021, 5:24 PM IST
Tags: goldmumbai

ताज्या बातम्या