मराठी बातम्या /बातम्या /विदेश /बिल गेट्स पडले पुन्हा प्रेमात; वयाच्या 76व्या वर्षी करतायत डेट, कोण आहे ती?

बिल गेट्स पडले पुन्हा प्रेमात; वयाच्या 76व्या वर्षी करतायत डेट, कोण आहे ती?

bill gates paula hurd

bill gates paula hurd

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले बिल गेट्स सध्या त्यांच्या लव्ह लाईफमुळे जोरदार चर्चेत आहेत.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

   मुंबई, 09 फेब्रुवारी : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले बिल गेट्स सध्या त्यांच्या लव्ह लाईफमुळे जोरदार चर्चेत आहेत. बिल गेट्स रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा माध्यमातील वृत्तांमधून केला जात आहे. बिल गेट्स हे ओरॅकल सॉफ्टवेअर कंपनीचे सीईओ दिवंगत मार्क हर्ड यांची पत्नी पॉला हर्डशी रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे. मार्क हर्ड यांचं 2019 मध्ये निधन झालं. बिल आणि पॉला गेल्या महिन्यांत झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेवेळी एकत्र दिसले होते. या दोघांनी एकत्रितपणे मॅचचा आनंददेखील लुटला. त्यामुळे बिल आणि पॉलाच्या प्रेमप्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

  माध्यमातील एका वृत्तानुसार, मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक 67 वर्षांचे बिल गेट्स 60 वर्षांच्या पॉला हर्ड यांना एक वर्षापासून डेट करत आहेत. पीपल या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, एका सूत्राने सांगितलं की, बिल गेट्स आणि पॉला हर्ड एकमेकांना डेट करत असल्याचं आता सर्वश्रुत आहे.

  ऑस्ट्रेलियन ओपनदरम्यान एकत्र दिसले होते बिल आणि पॉला

  विशेष म्हणजे गेल्या महिन्यात झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये बिल गेट्स आणि पॉला हर्ड एकत्र दिसले होते. हे कपल या वेळी शेजारी-शेजारी बसून मॅच पाहताना दिसलं. हे दोघं एक वर्षाहून अधिक काळ एकत्र असल्याचा दावा माध्यमातील वृत्तांमधून करण्यात आला आहे. पॉला ही एक रहस्यमयी स्त्री असल्याचं नेहमीच म्हटलं गेलंय. पण हे दोघं एका चांगल्या रोमँटिक रिलेशनशिपमध्ये आहेत.

  हेही वाचा : एका चॉकलेटमुळे सचिनची घरी पडली 'विकेट', क्रिकेटच्या देवाची अशीही लव्ह स्टोरी, PHOTOS

  पॉला हर्ड यांच्या पतीचं कॅन्सरचा प्रदीर्घ सामना केल्यानंतर ऑक्टोबर 2019 मध्ये वयाच्या 62 व्या वर्षी निधन झालं. पॉला हर्ड एक इव्हेंट प्लॅनर म्हणून काम करतात. एका वृत्तानुसार, पॉला हर्ड आणि बिल गेट्स या दोघांचं टेनिसवर नितांत प्रेम आहे. याच कारणामुळे मार्कच्या मृत्यूपूर्वी ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.

  बिल गेट्स यांचा 2021 मध्ये झाला आहे घटस्फोट

  गेल्या महिन्यात हे दोघं मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियन ओपनमधील पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीतील सामन्याचा आनंद लुटताना दिसले. पॉला आणि मार्क या दाम्पत्याला कॅथरीन आणि केली या दोन मुली आहेत. मेलिंडा फ्रेंच गेट्स आणि बिल गेट्स यांनी जवळपास 30 वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर मे 2021 मध्ये घटस्फोटाची घोषणा केली. त्यानंतर ऑगस्ट 2021 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. मात्र यानंतरही गेट्स फाउंडेशन आम्ही एकत्र चालवणार असल्याचं बिल आणि मेलिंडा यांनी स्पष्ट केलं आहे.

  First published:

  Tags: Bill gates