मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर क्रिकेटच्या मैदानावरील विक्रमांसाठी ओळखला जातो, सचिन यांचे वैवाहिक त्यांच्या क्रिकेट जीवनाइतकेच मनोरंजक आहे. सचिन तेंडुलकर यांचे प्रेमप्रकरण वयाच्या 17 व्या वर्षी सुरू झालं, जेव्हा अंजली मेहताने त्याला पहिल्यांदा विमानतळावर पाहिले होते. कुरळे केस असलेल्या सचिनला विमानतळावर पाहताच अंजली सचीन यांच्या प्रेमात पडली. पण मास्टर ब्लास्टर सचीन लाजत तिथून निघून गेले. तरीही अंजलीने हार मानली नाही आणि प्रेमकहाणी पुढे नेली. (Ajit Agarkar/Instagram) सचिन तेंडुलकर आणि अंजली मेहता यांची पहिली भेट 1990 मध्ये विमानतळावर झाली होती. त्यावेळी सचिन फक्त 17 वर्षांचा होता. सचिन इंग्लंड दौऱ्यावरून भारतात परतत होता. त्याचवेळी अंजलीही तिच्या आईला घेण्यासाठी विमानतळावर होती. दोघेही विमानतळावर अचानक भेटले आणि संपर्क झाला. अंजलीने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, सचिन तेंडुलकर कोण आहे आणि तो काय करतो हे मला माहीत नव्हते. माझ्यासोबत माझी एक मैत्रीण होती, तिने मला सांगितले की हा क्रिकेटर सचिन तेंडुलकर आहे आणि त्याने शतक केले आहे. याचवेळी मी त्याच्या प्रेमात पडले. (Sara Tendulkar/Instagram) अंजलीने सांगितले की, ती आईला घ्यायला विसरली आणि सचिन तेंडुलकरच्या मागे धावू लागली. सचिनने एक नजर वर करून अंजलीला पाहिलं, पण एक मुलगी त्याच्या नावाने ओरडून त्याच्या मागे धावत होती हे पाहून त्याला खूप लाज वाटली. त्याचे दोन्ही भाऊही सचिनसोबत होते. तो इतका खजील झाला होता की तो शरमलेल्या डोळ्यांनी बाहेर गेला आणि गाडीत बसला.(Sara Tendulkar/Instagram) यानंतर अंजलीने सचिन तेंडुलकरचा फोन नंबर शोधून त्याला फोन केला. तेव्हा अंजलीने सचिन तेंडुलकरला सांगितले की, मी अंजली तुला मी विमानतळावर पाहिले होते. हो मला आठवत आहे त्यावेळीपासून मी तुला मीस करतो आहे. यावेळी अंजलीने विचारले मी कोणत्या रंगाचा रंग घातला होता? यावर सचीनने लगेच सांगितलं होतं तू केशरी रंगाचा टी-शर्ट घातला होता. या फोन कॉलनंतर सचिन तेंडुलकर आणि अंजली मेहता यांची प्रेमकहाणी खऱ्याअर्थाने सुरू झाली. (Sachin Tendulkar/Instagram) सचिन तेंडुलकर खूप लाजाळू होता. अंजलीची आपल्या घरच्यांशी कशी ओळख करून द्यावी ते समजत नव्हते. सचीन आणि अंजली यांच्यातील नात्याबाबत घरच्यांना कोणतीही माहिती कळू द्यायची नव्हती. यासाठी त्यांनी एक शक्कल लढवली होती. सचीनने अंजलीला पत्रकार म्हणून घरी येण्यास सांगितलं होतं. (Sachin Tendulkar/Instagram) अंजली तेंडुलकर या व्यवसायाने डॉक्टर होत्या. अशा स्थितीत सचिन तेंडुलकरने अंजलीला सलवार कमीज घालून पत्रकार म्हणून घरी येण्यास सांगितले. सचिन तेंडुलकरला भेटण्यासाठी आतुर झालेली अंजलीही मास्टर ब्लास्टरच्या घरी पोहोचली, पण इथे सचिन आणि अंजली यांची चोरी एका चॉकलेटवरून पकडली गेली. (Sachin Tendulkar/Instagram) अंजली तेंडुलकरने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिची आणि सचिन तेंडुलकरची भेट आधीच नशीबात होती. तिने सांगितले की विमानतळाआधीही ती सचिन तेंडुलकरला दोन वेळा भेटू शकली होती, पण त्याला क्रिकेटमध्ये रस नव्हता. सचिन इंग्लंड दौऱ्यावर होता त्याचवेळी मी पण इंग्लंडमध्ये होते. त्यावेळी माझे वडील म्हणाले होते, भारतीय संघ इंग्लंडमध्ये आहे. शतक झळकावणाऱ्या मुलाशी त्यांना माझी ओळख करून द्यायची होती. पण मला क्रिकेटमध्ये रस नसल्याने मी नकार दिला. कदाचित मी सचिनला त्यावेळी भेटले असते तर सचिन 15 वर्षांचा असल्यापासून मी त्यांचा पाठलाग केला असता. (Sara Tendulkar/Instagram)