मराठी बातम्या /बातम्या /विदेश /27 वर्षाच्या नात्यानंतर विभक्त झाले बिल गेट्स आणि पत्नी मेलिंडा, पोस्ट करुन सांगितलं कारण

27 वर्षाच्या नात्यानंतर विभक्त झाले बिल गेट्स आणि पत्नी मेलिंडा, पोस्ट करुन सांगितलं कारण

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. लग्नाच्या 27 वर्षानंतर दोघांनी घटस्फोट (Bill Gates and Melinda Announce Divorce) घेत असल्याचं जाहीर केलं आहे.

नवी दिल्ली 04 मे : मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. लग्नाच्या 27 वर्षानंतर दोघांनी घटस्फोट (Bill Gates and Melinda Announce Divorce) घेत असल्याचं जाहीर केलं आहे. मेलिंडा आणि बिल गेट्स यांनी याबाबत संयुक्त निवेदन जारी केले आहे. विभक्त होण्याचं कारणही यात त्यांनी सांगितलं आहे. आपण दोघेही नव्या जीवनाला सुरुवात करत असल्याचं यात त्यांनी म्हटलं आहे.

आपल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं, की भरपूर चर्चा आणि आमच्या नात्याबाबत विचार केल्यानंतर आम्ही दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. मागील 27 वर्षात आमच्या तीन मुलांचं संगोपन करुन त्यांना मोठं केलं. आम्ही एक संस्थाही बनवली आहे, जी जगभरातील लोकांच्या आरोग्यासाठी आणि चांगल्या जीवनासाठी काम करते. या कामासाठी आम्ही यापुढेही एकसारखा विचार ठेवू आणि सोबतच काम करू. मात्र, आता आम्ही पती पत्नी म्हणून एकत्र राहू शकत नाही, असं आम्हाला वाटतं. आम्ही नवीन आयुष्य सुरू करत आहोत. या काळात लोकांकडून कुटुंबाला स्पेस आणि प्रायवसी मिळेल, अशी अपेक्षा आहे.

अशी सुरू झाली होती लव्ह स्टोरी (Love Story of Bill Gates and Melinda) -

बिल गेट्स आणि मेलिंडा यांची भेट 1987 मध्ये न्यूयॉर्कमध्ये झाली होती. इथेच दोघांमध्ये बातचीत सुरू झाली. Microsoft च्या कार पार्किंगमध्ये बिल गेट्स यांनी मेलिंडा यांना बाहेर फिरण्यासाठी जाण्यास विचारले होते. बिल गेट्स यांनी विचारले, की इथून पुढे दोन आठवडे तू फ्री आहेस का? मात्र, मेलिंडा यांनी त्यावेळी त्यांना नकार दिला होता आणि म्हटलं होतं, की योग्य वेळ आल्यावर मला हा प्रश्न विचार.

यानंतरही बिल गेट्स यांनी हार मानली नाही. हळूहळू दोघांमध्ये जवळीक वाढत गेली. काही महिन्यांतच दोघांनीही आपलं नातं यशस्वी बनवलं. 1993 मध्ये त्यांनी साखरपुडा केला आणि आणि नवीन वर्षाच्या दिवशी 1994 मध्ये दोघेही विवाहबंधनात अडकले.

First published:
top videos

    Tags: Bill gates, Divorce, Love story