इस्लामाबाद, 30 मार्च : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये मोठी राजकीय उलथापालथ सुरू आहे. पंतप्रधान इम्रान खान यांची खुर्ची कधीही जाऊ शकते. अशा परिस्थितीत पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद अहमद यांनी एक मोठा खुलासा केला आहे. एका कार्यक्रमाला संबोधित करताना रशीद यांनी 26/11 मुंबई हल्ल्यातील दोषी अजमल कसाबचा उल्लेख केला. भारताला कसाबचा पत्ता माहित नसल्याचे त्यांनी सांगितले. पण पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी कसाबचा पत्ता भारताला दिला. इतकेच नाही तर नवाझ शरीफ सद्दाम हुसेन, मुअम्मर अल-गद्दाफी आणि ओसामा बिन लादेन यांसारख्या दहशतवाद्यांकडून पैसे घेत असत, असा दावाही राशिद यांनी केला आहे.
रशीद काय म्हणाले?
गृहमंत्री म्हणाले, 'नवाज शरीफ यांनी अजमल कसाबचा पत्ता भारताला दिला. अजमलच्या फरीदकोटमधील घराची माहिती भारताला नव्हती, पण त्यांनी (नवाज शरीफ) ते सांगितले. माझे म्हणणे चुकीचे सिद्ध झाले तर चोराची शिक्षा हीच माझी शिक्षा आहे.
रशीद पुढे म्हणाले, 'पंतप्रधान, ठामपणे उभे राहा, मी तुम्हाला विनंती करतो. खरंच इम्रान खान हे एका सीटचे नेते आहेत. मी आयुष्यभर दोन आणि एका सीटचे राजकारण केले आहे. पण इम्रान खान यांच्यासोबत मी राजकारण केल्याचा मला अभिमान आहे. आज समाजाने आणि अल्लाहने तुम्हाला शांतता दिली आहे. निवडणुकीच्या वेळीही ते तुमच्याकडे नव्हते. हे सर्व (इम्रान यांची साथ सोडून गेलेले) चालत तुमच्याकडे येतील, पण तुम्ही त्यांना त्यांची जागा दाखवा.'
Pakistan PM Imran Khan | इम्रान खान यांचा निरोप निश्चित, फक्त प्रतीक्षा बाकी! 'हे' असतील पाकिस्तानचे पुढचे पंतप्रधान
गृहमंत्री रशीद म्हणाले, 'हे विकले जाणारे लोकं, राजकीय किडे, गटारातील विटा, ज्यांनी पैसे घेऊन आपली सदसद्विवेकबुद्धी विकली आणि पाकिस्तान सारख्या ताजमहाल कलंकित केले. त्यांची जी इच्छा असेल ती असेल. जनतेचे मत आणि जनतेची विचारधारा तुमच्या पाठीशी आहे. त्यांनी सद्दामचा माल खाल्ला, गद्दाफीचा माल खाल्ला. मी स्वतः गद्दाफीशी करार करायला जायचो. त्यांनी ओसामा बिन लादेनचाही पैसा खाल्ला आहे.
इम्रान सरकार अल्पमतात
पाकिस्तानातील इम्रान खान यांचे सरकार अडचणीत आले आहे. विरोधकांनी इम्रान सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. संख्येच्या बाबतीतही इम्रान कमकुवत होताना दिसत आहे. पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीच्या एकूण सदस्यांची संख्या 342 आहे. बहुमतासाठी 172 खासदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. इम्रानच्या नेतृत्वाखालील पीटीआय युतीमध्ये 179 सदस्य होते. परंतु, एमक्यूएम-पीसह उर्वरित मित्रपक्षांनी साथ सोडल्यानंतर 164 सदस्य उरले आहेत. दुसरीकडे विरोधकांची संख्या 177 झाली आहे. इम्रानचे 24 खासदार बंडखोर असल्याचं बोललं जातंय, आता अविश्वास ठरावावर विरोधकांनी पाठिंबा दिला नाही तरी सरकार पडेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.