लाहोर, 14 एप्रिल: पाकिस्तानच्या लाहोर शहरात इस्लामिक पक्षाच्या प्रमुखाला अटक झाल्यानंतर, मंगळवारी हिंसक चकमकीत दोन आंदोलकांसह एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानातील वरिष्ठ पोलीस अधिकारी गुलाम मोहम्मद डोगर यांनी सांगितलं की, पाकिस्तानातील तहरीक-ए-लब्बैक या संघटनेचे प्रमुख साद रिझवी यांना सोमवारी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर रात्रीच्या वेळी त्यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येनं रस्त्यावरून उतरून आंदोलन केलं आहे. पण त्यानंतर झालेल्या चकमकीत एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे. त्यांनी पुढे सांगितलं की म्हणाले की, शाहदरा शहरात झालेल्या चकमकीत 10 पोलीस जखमी झाले आहेत. तर या हिंसाचारात 800 भारतीय नागरिक देखील अडकले आहेत.
पाकिस्तानातील पंजाब प्रांतात दोन इस्लामवादी नागरिकांना मारलं गेल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. प्रेषित मोहम्मद यांचा फोटो प्रकाशित करण्याची मागणी करणाऱ्या फ्रेंच राजदूताला सरकारने हद्दपार न केल्यास आंदोलन करू असा इशारा रिझवी यांनी दिला होता. त्यामुळे त्यांना सोमवारी अटक करण्यात आली. त्यानंतर सोमवारी रात्रीपासून रिझवी यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येनं एकत्र येऊन निदर्शने केली आहेत. त्यामुळे शहरात हिंसाचाराला सुरुवात झाली आहे.
पोलीस अधिकारी डोगर यांच्या मते, देशात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी रिझवीला अटक करण्यात आली होती. परंतु त्यांना ताब्यात घेतल्यानंतर, त्यांच्या इस्लामवादी समर्थकांनी देशातील विविध शहरांत हिंसक निदर्शनं केली. आंदोलकांनी अनेक शहरांमधील महामार्ग आणि रस्ते रोखून धरले आहेत. दोन दिवसांपूर्वी रिझवी यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे फ्रान्सच्या राजदूताला माघारी पाठवण्याची मागणी केली होती. 20 एप्रिलपूर्वी कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होत. पण तत्पूर्वी सरकारकडून त्यांना अटक केल्यानंतर समर्थकांनी हिंसक पद्धतीनं निदर्शने करायला सुरुवात केली आहे.
हे वाचा-पाकिस्तानात सैन्य दलासाठी नवीन विधेयकामुळे इम्रान सरकारमध्ये फूट
इस्लामवादी आंदोलकांनी पाकिस्तानातील विविध राष्ट्रीय महामार्ग रोखून धरल्याने साधारणतः 800 भारतीय शीख बांधव पाकिस्तानमध्ये अडकून पडले आहेत. सोमवारी बैसाखी सणानिमित्त अनेक भारतीय शीख समुदाय पंजा साहिब यांच्या रावळपिंडीतील गुरुद्वाराचं दर्शन घेण्यासाठी गेले होते. त्यातील अनेक लोकं अद्याप गुरुद्वारापर्यंत पोहचू शकले नाहीत. बुधवारी याठिकाणी मुख्य कार्यक्रम होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.