मराठी बातम्या /बातम्या /विदेश /मशिदीसमोर भीक मागायची महिला, चौकशी केल्यावर पोलिसही हादरले

मशिदीसमोर भीक मागायची महिला, चौकशी केल्यावर पोलिसही हादरले

photo - AFP

photo - AFP

ही महिला दिवसभर शहरातील विविध मशिदींमध्ये भीक मागायची.

    यूएई, 27 जानेवारी : पुस्तकाच्या कव्हरवरून पुस्तकाच्या आतमध्ये लिहिलंय, याचा अंदाज लावू नये, अशा आशायचा एक इंग्रजी वाक्प्रचार आहे. संयुक्त अरब अमिरातीतील (यूएई) पोलिसांना नुकतीच याची प्रचिती आली आहे. अबुधाबी शहरातील पोलिसांनी एका अशा महिला भिकाऱ्यावर कारवाई केली आहे जिच्याकडे एक आलिशान कार आणि भरपूर रोकड आहे.

    ही महिला दररोज शहरातील मशिदींसमोर भीक मागायची आणि आपल्या आलिशान कारमधून घरी जात असे. भीक मागणाऱ्या महिलेवर एका व्यक्तीला संशय आल्यानं त्यानं पोलिसांना याबाबत माहिती दिली होती. पोलिसांनी या महिलेवर कारवाई करून कार आणि तिच्याकडील रोकड जप्त केली आहे. 'आज तक'नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

    संयुक्त अरब अमिरातीमध्ये भीक मागण्याची कृती गुन्ह्याच्या श्रेणीत येते. पण, आलिशान कराची मालकीण असलेल्या महिला भिकाऱ्याला बघून अबुधाबी पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. खलीज टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, अबुधाबीतील एका रहिवाशाला संशय आला होता की, संबंधित महिला परिसरातील मशिदींमध्ये भीक मागत आहे. त्यानंतर या व्यक्तीनं पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या महिलेवर पाळत ठेवली असता धक्कादायक माहिती समोर आली.

    ही महिला दिवसभर शहरातील विविध मशिदींमध्ये भीक मागायची. भीक मागून ती काही अंतर चालत जायची. एका ठराविक ठिकाणापर्यंत पोहचल्यानंतर ती एका कारच्या माध्यमातून घरीने जात असे. पोलिसांनी तिचा पाठलाग केला तेव्हा ही महिला भिकारी महागडी आलिशान कार चालवत घरी जात असल्याचं आढळलं. पोलिसांनी तिला ताब्यात घेतलंअसता तिच्याजवळ बरीच रोकड सापडली. पोलिसांनी या महिलेवर कडक कारवाई केली आहे.

    अबुधाबी शहरातील पोलिसांनी आधीच स्पष्ट केलं होतं की, सार्वजनिक सुरक्षा निश्चित करण्यासाठी आणि भीक मागण्यासारख्या वाईट वर्तनावर अंकुश ठेवण्यासाठी त्यांनी आपले प्रयत्न वाढवले आहेत.

    हेही वाचा - मुलाच्या उपस्थितीत ग्रँडस्लॅम खेळण्याची संधी मिळाली, सानियाच्या डोळ्यात आले आनंदाश्रू

    अबुधाबी पोलिसांनी गेल्या वर्षी 6 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर दरम्यान 159 भिकाऱ्यांना अटक केल्याचं सांगितलं. पोलीस अधिकारी म्हणतात की, भीक मागणं हा सामाजिक शाप आहे. त्यामुळे कोणत्याही समाजाच्या सभ्य प्रतिमेवर डाग लागतो. पोलीस म्हणाले, "भीक मागणं हे असंस्कृत कृत्य आहे आणि यूएईमध्ये हा गुन्हा आहे. भिकारी फसवणूक करतात आणि लोकांच्या चांगुलपणाचा फायदा घेऊन त्यांची फसवणूक करतात."

    यूएईमध्ये भीक मागण्यासाठी शिक्षेची तरतूद आहे. भीक मागितल्यास, एखाद्या व्यक्तीला तीन महिने तुरुंगवास आणि पाच हजार दिरहम (सुमारे एक लाख 11 हजार रुपये) किंवा दोनपैकी एक दंड होऊ शकतो. जर एखादी व्यक्ती संघटित पद्धतीनं टोळ्यांच्या माध्यमातून भीक मागत असेल तर तिला सहा महिने तुरुंगवास आणि एक लाख दिरहम (सुमारे 22 लाख 17 हजार रुपये) दंडाची शिक्षा होऊ शकते.

    First published:

    Tags: Crime news, Masjid, UAE, Woman