DYfढाका, 7 डिसेंबर: प्रसिद्ध अभिनेत्रीला बलात्काराची धमकी दिल्याप्रकरणी एका केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला आहे. बांग्लादेशचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांना महिलेला बलात्काराची धमकी देणं चांगलंच महागात पडलं. मंत्रीपद असल्यामुळे कुणीही आपल्या केसाला धक्का लावू शकत नाही, असा भ्रमात वावरणारे हे मंत्रीमहोदय यापूर्वीदेखील महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करताना आढळले होते. काही दिवसांपूर्वी बांग्लादेशमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि कलाकार माहिया माही यांना बलात्काराची धमकी दिली होती. हे प्रकरण मुराद यांना चांगलंच महागात पडलं आहे.
बांग्लादेशमधील प्रसिद्ध अभिनेत्री माहिया माही
फोनवरून दिली धमकी
‘ढाका ट्रिब्यून’नं दिलेल्या माहितीनुसार बांग्लादेशमधील अभिनेत्री माहिया माही यांना काही दिवसांपूर्वी मुराद हसन यांनी काही दिवसांपूर्वी फोन केला होता. यावेळी काही मुद्द्यांवरून दोघांमध्ये मतभेद झाले. त्यानंतर चिडलेल्या मुराद हसन यांनी फोन कट केला. यावेळी अभिनेत्री माही यांच्यासोबत एक अभिनेतादेखील उपस्थित होता. त्यानंतर काही वेळातच हसन यांनी पुन्हा एकदा माहींना फोन केला आणि रागाच्या भरात बोलायला सुरुवात केली. त्यावेळी त्याला विरोध करणाऱ्या माही यांना बलात्कार करण्याची धमकी मुराद यांनी दिली. या प्रकाराने संतापलेल्या अभिनेत्री माही यांनी या प्रकाराची तक्रार दाखल करत मोबाईलवरील संभाषणाची क्लिप पोलिसांना दिली.
क्लिप झाली व्हायरस
देशाचा एक केंद्रीय मंत्री देशातीलच एका प्रसिद्ध अभिनेत्रीला जाहीरपणे बलात्कार करण्याची धमकी देत असल्याची क्लिप देशभर व्हायरल झाली आणि पंतप्रधान शेख हसीना यांच्यावरही टीका होऊ लागली. अशा मंत्र्याला मंत्रिमंडळात स्थान देत असल्याबद्दल होणारी टीका आणि सरकारची प्रतिमा या बाबी लक्षात घेता पंतप्रधान शेख हसीना यांनी मुराद हसन यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले. त्यानंतर मुराद यांनी राजीनामा दिला आहे.
हे वाचा- रिकाम्या ऑफिसमध्ये तरुणीचा कारनामा, सोशल मीडियात VIDEO होतोय व्हायरल
वादग्रस्त मुराद हसन
आपल्याविरुद्ध षडयंत्र रचलं जात असून क्लिपमधील आवाज आपला नसल्याचा दावा मुराद यांनी केला आहे. यापूर्वीदेखील एका प्रकरणात मुराद यांनी महिलांचा अपमान केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा यांच्या नातीवर अश्लाघ्य भाषेत टीका केली होती. यामुळे बांग्लादेश सरकारची चांगलीच नाचक्की होत होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bangladesh, Politices, Prime minister