नवी दिल्ली, 29 एप्रिल : कल्पना करा की, तुम्ही घरातून बाहेर पडण्यासाठी अॅपवरून कॅब बुक केली आणि सफाईदार वळणं घेत ती तुमच्या दारातही आली. पण आत बसताच कळलं की, यात तर चालकच नाही. ड्रायव्हर गेला कुठे हे शोधायचा विचार मनात येतोय न येतोय तोच गाडी पुन्हा सुरू झाली आणि चालकाशिवायच चालू लागली आणि तुम्हाला इच्छिच ठिकाणी घेऊन जाण्यासाठी रस्त्यावरून निघालीही.. होय, ही आतापर्यंत फक्त विचारांत असणारी गोष्ट आता चीनमध्ये प्रत्यक्षात आली आहे. Pony.ai सेवा सुरू केली चीनमध्ये ऑटोनॉमस ड्रायव्हिंग स्टार्टअप कंपनी Pony.ai ने ड्रायव्हरलेस रोबोटिक सेवा सुरू केली आहे. कंपनीने Baidu या सर्च इंजिनच्या सहकार्याने ही सेवा सुरू केली आहे. Baidu ने अलीकडच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान (Artificial intelligence technology) आणि सेल्फ-ड्रायव्हिंगमध्ये (self driving) मोठी गुंतवणूक केली आहे. हे वाचा - तुम्ही कधी बसणार का अशा परीक्षेला? चीनमध्ये 9 तासांचा असतो पेपर! चीन सरकारने परवाना दिला ब्लूमबर्गच्या बातमीनुसार, Pony.ai ला या रोबो टॅक्सी सेवेसाठी चीन सरकारकडून परवानाही मिळाला आहे. या टॅक्सीसाठी आता चालकाची गरज भासणार नाही, असा विशेष उल्लेख परवान्यात करण्यात आला आहे. ग्राहक कंपनीच्या अॅपवरून ही कॅब सेवा बुक करू शकतात. याबाबत Baidu तर्फे एक ट्विटही केलं आहे.
On Apr 28, Baidu received the first-ever permits in China to provide #driverless ride-hailing services to the public on open roads in Beijing. Licensed cars will join the #ApolloGo fleet and start serving passengers. To a fully driverless mobility future! https://t.co/hJCjeirtQc pic.twitter.com/BMaJ6LyNDU
— Baidu Inc. (@Baidu_Inc) April 28, 2022
ही सेवा अशा प्रकारे कार्य करेल ग्राहक कंपनीच्या अॅपवर ड्रायव्हरलेस कॅब (driverless cab) बुक करतील. कॅब ग्राहकापर्यंत पोहोचल्यावर त्याला कारचा क्यूआर कोड (QR code) स्कॅन करावा लागेल. यानंतर, टच स्क्रीनवर कार जिकडे घेऊन जायची आहे, ते स्थान निवडावं लागेल आणि त्यानंतर कार स्वतः चालेल आणि स्वाराला त्याच्या गंतव्यस्थानावर घेऊन जाईल. यासाठीचं पेमेंटही डिजिटल पद्धतीनं केलं जाणार आहे.