Home /News /videsh /

वयाच्या दहाव्या वर्षी कोट्यधीश, दोन कंपन्यांची मालकीण... नेमकं काय करते 'ही' मुलगी?

वयाच्या दहाव्या वर्षी कोट्यधीश, दोन कंपन्यांची मालकीण... नेमकं काय करते 'ही' मुलगी?

Pixie Curtis ने आई Roxy Jacenko च्या मदतीने खेळण्यांची एक कंपनी सुरु केली होती. Pixie's Fidgets असं या कंपनीचं नाव होतं. या कंपनीची सुरुवात एवढी दमदार होती की, लॉन्च नंतर अवघ्या 48 तासातचं सर्व खेळणी विकल्या गेल्या होत्या.

    सिडनी, 15 जानेवारी : श्रीमंत व्हावं हे सर्वाचंच स्वप्न असतं आणि श्रीमंत होण्यासाठी बिझनेस सोपा मार्ग आहे. मात्र बिझनेस करणे वाटतं तितकं सोपं नसतं. अनेकजण बिझनेस करतात मात्र यशस्वी होतातच असं नाही. त्यामुळे बिझनेस करण्यापेक्षा यशस्वीरित्या तो मोठा करणे कठीण काम आहे. मात्र काहीना हे यश कमी वयात गाठता येतं. ऑस्ट्रेलियाच्या अवघ्या 10 वर्षाच्या मुलीने ही यशस्वी कागगिरी केली आहे. Pixie Curtis असं या मुलीचं नाव आहे. Pixie ची खेळण्यांची कंपनी आहे आणि या व्यवसायातून ती दहाव्या वर्षीच करोडपती बनली आहे. 'आज तक'ने याबाबतचं वृत्त प्रसारित केलं आहे. Pixie Curtis ने आई Roxy Jacenko च्या मदतीने खेळण्यांची एक कंपनी सुरु केली होती. Pixie's Fidgets असं या कंपनीचं नाव होतं. या कंपनीची सुरुवात एवढी दमदार होती की, लॉन्च नंतर अवघ्या 48 तासातचं सर्व खेळणी विकल्या गेल्या होत्या. याशिवाय Pixie च्या नावे आणखी एक बिझनेस आहे ज्याचं नाव Pixie's Bows असं आहे. दोन्ही कंपन्या आता Pixie's Pix चा भाग आहेत. याला म्हणतात जिद्द! वयाच्या 51व्या वर्षी दिली बारावीची परीक्षा; निकाल बघून पतीलाही बसला धक्का Jacenko  यांना वाटत की जर Pixie ची इच्छा असेल तर 15 वर्षी ती निवृत्त देखील होऊ शकते. news.com.au ला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं की त्यांच्या कुंटुंबात मजामस्तीत असं म्हटलं जातं की मी 100 वर्षाची होईपर्यंत काम करेन आणि Pixie 15 व्या वर्षी निवृत्त होईल. Jacenko यांनी  म्हटलं की मला सांगता येणार नाही की आमच्या दोघांमध्ये कोण जास्त स्मार्ट आहे. IIT मंडीच्या संचालकांनी दिला भूत काढण्याचा अजब मंत्र, Viral झाला Video पिक्सी सोशल मीडियावर पॉप्युलर पिक्सी सोशल मीडियावर खुप अॅक्टिव्ह आहे. Instagram तिने 5100 हून अधिक पोस्ट शेअर केल्या आहेत. एक लाखांहून अधिक लोक तिला तिथे फॉलो करतात. तर पिक्सीची आई Jacenko एवढ्या यशानंतरही विचार करतात की पिक्सीला कंपनीसाठी काम करणे बंधनकारक वाटू नये. त्या स्वत: देखील एक यशस्वी उद्योजिका आहे आणि अनेक व्यवसाय चालवतात. त्यामुळे Pixie आणि Jacenko या स्वत:चा यशस्वी बिझनेस सुरु करु इच्छिणाऱ्या अनेकांसाठी एक प्रेरणा आहेत.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Business, Startup Success Story

    पुढील बातम्या