मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

याला म्हणतात जिद्द! वयाच्या 51व्या वर्षी दिली बारावीची परीक्षा; निकाल बघून पतीलाही बसला धक्का

याला म्हणतात जिद्द! वयाच्या 51व्या वर्षी दिली बारावीची परीक्षा; निकाल बघून पतीलाही बसला धक्का

भंवरी शेखावत यांना राजस्थानमध्ये सर्वाधिक गुण मिळाल्याबद्दल मीरा पुरस्कारानंही गौरवण्यात आलं आहे

भंवरी शेखावत यांना राजस्थानमध्ये सर्वाधिक गुण मिळाल्याबद्दल मीरा पुरस्कारानंही गौरवण्यात आलं आहे

12वीची परीक्षा देण्यासाठी त्यांनी 33 वर्षांनी पुन्हा अभ्यास सुरू केला. दोन वर्षांपूर्वी बारावीचा निकाल पाहून भंवरीच्या पतीला धक्काच बसला.

  • Published by:  Atharva Mahankal

झुंझुनू (राजस्थान), 15 जानेवारी: अशक्यही शक्य करण्याची हिंमत आणि जिद्द तुमच्यात असेल तर वय (Success story) कधी महत्त्वाचं नसतं हे अनेकांनी आतापर्यंत दाखवून दिलं आहे. शिक्षण घेण्याची इच्छा (Right to Education) असेल तर वय काहीही असो यश मिळू शकतं. हे सिद्ध केलंय 53 वर्षीय भंवरी यांनी. भंवरीने वयाच्या 51व्या वर्षी केवळ 12वी बोर्डाची परीक्षा (12th exam at the age of 51) उत्तीर्ण केली नाही, तर संपूर्ण राजस्थानमध्ये सर्वाधिक क्रमांकही (Success story of bhanwari shekhawat) आणले. 12वीची परीक्षा देण्यासाठी त्याने 33 वर्षांनी पुन्हा अभ्यास सुरू केला. दोन वर्षांपूर्वी बारावीचा निकाल पाहून भंवरीच्या पतीला धक्काच बसला.

भंवरी शेखावत या झुंझुनू येथील विवेक नगर येथे राहणाऱ्या गृहिणी आहेत. भंवरीचे पती सुरेंद्र सिंह शेखावत हे झुंझुनू डीजे कोर्टात वकील आहेत. भंवरी शेखावत (Women success story) 1986 मध्ये महाराष्ट्र बोर्डातून 10वी उत्तीर्ण झाल्या होत्या. दहावी पास झाल्यावरच लग्न झाले. लग्नानंतर त्या झुंझुनूला आल्या. भंवरी शेखावत सांगतात की, इथून पुढे अभ्यास सुरू ठेवण्याची परिस्थिती आणि वातावरण नव्हतं.. पण त्यांना अभ्यासाची जिद्द होती.. पुढे शिक्षण घ्यायचं होते. सासरच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांनी आपल्या इच्छा दडपल्या. अभ्यास करता येत नव्हता पण ग्रॅज्युएशन पूर्ण करायचं होतं.

पहिल्याच प्रयत्नात बीडच्या श्रद्धाने केली UPSC क्रॅक,बळीराजाच्या मुलीची गगनभरारी

अखेर भंवरी यांनी तब्बल 33 वर्षानंतर पुन्हा शिक्षण सुरु केलं. भंवरीची पदवीपर्यंत शिकण्याची इच्छा होती. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी ओपन बोर्डातून फॉर्म भरला. तिला अभ्यास सोडून जवळपास 33 वर्षे झाली होती, पण भंवरी घरची कामं करायची आणि अभ्यासही करायची. दहावीची पुस्तकं वाचायला सुरुवात केली. भंवरी अतिशय गांभीर्याने अभ्यास करत होती. दररोज घरातील सर्व कामे करून दुपारी तीन ते चार तास ती अभ्यास करायची असं भंवरीचे पती सुरेंद्र सिंह हे सांगतात.

51 व्या वर्षी मी 12वीला शिकत आहे, असे कोणाला सांगण्यात आलं तेव्हा लोक म्हणाले, आता तू काय करणार, म्हातारपणात 12वी कोण करतं, आता अभ्यास कसा करणार. या वयात अभ्यास होतो का असे प्रश्नही उपस्थित करण्यात आलेत. मात्र या सर्व प्रश्नांमुळे मी निराश होण्याआधी अभ्यास करण्यासाठी उत्तेजित झाले आणि जोमानं अभ्यासाला लागले. मी परीक्षा चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण करून दाखवील यावर माझ्या कुटुंबाबतील कोणाचाच विश्वास नव्हता. मात्र मी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला असं भंवरीजी सांगतात.

भंवरी यांनी संपूर्ण राजस्थानमध्ये सर्वाधिक गुण घेऊन परीक्षा उत्तीर्ण केली. यामुळे भंवरी यांचे पतीही आश्चर्यचकित झाले आणि कुटुंबाबतील व्यक्तींनाही धक्का बसला. इतकंच नाही तर भंवरी शेखावत यांना राजस्थानमध्ये सर्वाधिक गुण मिळाल्याबद्दल मीरा पुरस्कारानंही गौरवण्यात आलं आहे.

First published: