मराठी बातम्या /बातम्या /विदेश /अबब! दुर्मिळ व्हिस्की संग्रहाला तब्बल 6.7 दशलक्ष डॉलर्सची किंमत; एका बाटलीला तब्बल 10 लाख डॉलर्स

अबब! दुर्मिळ व्हिस्की संग्रहाला तब्बल 6.7 दशलक्ष डॉलर्सची किंमत; एका बाटलीला तब्बल 10 लाख डॉलर्स

दारू जितकी जास्त जुनी तितकी तिची किंमत जास्त असते, असं म्हणतात. जगभरात दारूचे दर्दी चाहते अशा  दारूचा संग्रह करतात.

दारू जितकी जास्त जुनी तितकी तिची किंमत जास्त असते, असं म्हणतात. जगभरात दारूचे दर्दी चाहते अशा दारूचा संग्रह करतात.

दारू जितकी जास्त जुनी तितकी तिची किंमत जास्त असते, असं म्हणतात. जगभरात दारूचे दर्दी चाहते अशा दारूचा संग्रह करतात.

ब्रिटन, 25 फेब्रुवारी :दारू जितकी जास्त जुनी तितकी तिची किंमत जास्त असते, असं म्हणतात. जगभरात दारूचे दर्दी चाहते अशा दुर्मिळ दारूचा संग्रह करतात. पाश्चात्त्य देशांमध्ये अनेक ठिकाणी शेकडो वर्ष जुन्या दारू निर्माण करणाऱ्या कंपन्या आजही अस्तित्वात आहेत. आजही त्यांनी अनेक वर्ष जुनी दारू संग्रहात ठेवली आहे. अशा अतिशय जुन्या दारूची किंमत नेहमीच्या दारूपेक्षा अनेकपटींनी अधिक असते. अशा दारुचा संग्रहही अनेक शौकीन लोक करत असतात. दुर्मिळ दारुच्या विक्रीसाठी मोठ मोठ्या लिलावांचे आयोजन केलं जातं. जगभरातील ऐतिहासिक दारूचा संग्रह करणारे लोक त्यात भाग घेतात. नुकत्याच अशाच एका लिलावानं जगभरातील दारू प्रेमींचं लक्ष वेधून घेतलं.

एका शंभर वर्षापूर्वीच्या व्हिस्कीच्या संग्रहाचा (Whisky Collection) लिलाव (Auction) नुकताच ब्रिटनमध्ये (UK) आयोजित करण्यात आला होता. त्यात व्हिस्कीच्या एका बाटलीला (Whisky Bottle) तब्बल दहा लाख डॉलर्स म्हणजे 7 कोटी रुपये अशी प्रचंड किंमत मिळाली. दुर्मिळ व्हिस्कीच्या बाटलीला आतापर्यंत मिळालेली ही सर्वाधिक किंमत आहे.  मॅकलन (Macallan) डीस्टीलरी कंपनीनं 1926 मध्ये म्हणजे जवळपास 100 वर्षांपूर्वी बनवलेली ही व्हिस्की जगातील सर्वात दुर्मिळ अशा 14 दारुंच्या प्रकारांपैकी एक आहे. त्याचप्रमाणे 3900 सिंगल माल्टसच्या (Single Malt) संग्रहाला तब्बल 6.7 दशलक्ष डॉलर्स इतकी प्रचंड किंमत मिळाली. प्रथमच एका खासगी संग्रहाला अशी सहा आकडी किंमत मिळली आहे. या लिलावात बाल्व्हेनी 1961 व्हिंटेज कास्क  (Balvenie 1961 Vintage cask )  स्कॉटलंडमधील (Scotland) अतिशय जुन्या पण आता अस्तित्वात नसलेल्या एका डीस्टीलरीमध्ये तयार झालेली ऐतिहासिक डल्लास धु 1921 प्रायव्हेट कास्क (Dallas Dhu 1921 Private Cask) ही 64 वर्षं जुनी माल्ट अशा अनेक व्हिस्कीच्या प्रकारांचा समावेश होता.

(हे पहा :  टॉप 10 सेक्सी सुपरमॉडेल्समध्ये समावेश असणारी भारतीयच नव्हे एकमेव आशियाई व्यक्ती )

जगभरातल्या 54 देशांमधील 1557 खरेदीदारांनी (Bidder)या ऑनलाइन लिलावात सहभाग घेतला होता. एकाच व्यक्तीकडे असणाऱ्या संग्रहाला ऑनलाइन लिलावात प्रथमच इतकी प्रचंड किंमत मिळाली आहे. या व्हिस्की लिलावाचे संस्थापक (Founder of Whisky Auctioneer) इयान मॅक्लूनी (Iain Mc Clune) म्हणाले, हा लिलाव संपूर्णपणे एकाच संग्रहकर्त्याकडील व्हिस्कीच्या अतिशय दुर्मिळ प्रकारांसाठी आयोजित करण्यात आला होता. या लिलावाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद, संग्रहाला मिळालेली अती प्रचंड किंमत यामुळं या लिलावानं एक अनोखा विक्रम नोंदवला आहे. फक्त आयोजकांसाठी नाही, तर संपूर्ण व्हिस्की उद्योग क्षेत्रासाठी हा एक ऐतिहासिक लिलाव ठरला आहे.

First published:

Tags: Alcohol, Auction, International, Money, Super expensive, United kingdom, Whisky