तेहरान, 14 नोव्हेंबर : अमेरिकेने (America) 1998 मध्ये केनिया आणि तंजानियामधील अमेरिकेच्या दूतावासावर दहशतवादी संघटना अल-कायदाने (Al-Qaeda) भीषण हल्ल्याचा बदला 22 वर्षांनंतर पूर्ण केला आहे. अमेरिकेकडून इज्राईलच्या गुप्तहेर संघटना 'मोसाद'च्या जवानांनी इराणची राजधानी तेहरानमध्ये लपलेला अल-कायदाचा दुसऱ्या क्रमांकाचा म्होरक्या अबू मोहम्मद अल मस्त्री (58) याला त्याने केलेल्या हल्ल्याच्या दिवशीच मारण्यात आलं. यादरम्यान अल-कायदाचा म्होरक्या आसोमा बिन लादेनची सूनही मारली गेली.
अल-कायदाने केलेल्या या भीषण हल्ल्यात 224 लोक मारले गेले होते, तर अनेक जखमी झाले होते. अबू मोहम्मद हा या हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याचे सांगितले जाते. न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार अल-कायदाच्या दुसऱ्या क्रमांकाचा नेता अबू मोहम्मद उर्फ अब्दुल्ला अहमद अब्दुल्ला याच्यावर त्याच्या मुलीसह 7 ऑगस्ट रोजी तेहरानच्या रस्त्यांवर गोळी मारण्यात आली होती. सांगितले जाते की, इज्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांनी अमेरिकेचा बदला घेतला. आफ्रिकन देश केनिया आणि तंजानियामध्ये अमेरिकेच्या दूतावासावर 9 ऑगस्ट 1998 मध्ये झालेल्या भीषण हल्ल्यात 224 लोक मारले गेले होते व हजारो लोक जखमी झाले होते. अमेरिकेच्या वतीने इज्राईलने अल-कायदाचा म्होरक्या मारून हा बदला घेतला आहे.
हे ही वाचा-ऐन दिवाळीत ऋषिकेशवर शोककळा! LOC वर पाकशी लढताना BSF चे अधिकारी राकेश डोवाल शहीद
FBI ने घोषित केलं होतं 1 कोटी डॉलरचं बक्षीस
अबू मोहम्मदवर अमेरिकेची तपास यंत्रणा एफबीआयने 1 कोटी डॉलरचं बक्षीस घोषित केलं होतं. ऑगस्टमध्ये हा हत्याकांड केल्यानंतर आतापर्यंत ना अमेरिका..ना इराण आणि इज्राईलनेही याचा सार्वजनिक स्वरुपात स्वीकार केला नव्हता. मात्र अद्याप हे स्पष्ट झालेलं नाही की, अबू मोहम्मद याच्या हत्येमागे अमेरिकेची नेमकी काय भूमिका होती. मात्र अमेरिका गेल्या अनेक वर्षांपासून इराणमध्ये राहणाऱ्या दहशतवादी कारवायांवर लक्ष ठेवून आहे.
न्यूयॉर्क टाइम्सने सांगितलं की, अबू मोहम्मदची हत्यादेखील सीक्रेट होती. विशेष म्हणजे इराणच्या सरकारी मीडियाने या घटनेचे वृत्त दिले होते. आणि मृत व्यक्तीचं नाव हबीब दाऊद आणि त्याची 27 वर्षांची मुलगी मरियम होती. इराणी मीडियाने सांगितले की, हबीब दाऊद लेबनान हे इतिहासाचे प्रोफेसर होते. न्यूयॉर्क टाइम्सने सांगितलं की, दाऊद नावाचा कोणताही व्यक्ती उपस्थित नव्हता आणि या बनावटी नावाचा वापर इराणची गुप्तहेर संघटनेचे अधिकारी करीत होते. इराणच्या एजंट्सनी त्यांना शरण घेतलं होतं.
मरियमचं लग्न ओसामा बिन लादेन याच्या मुलासोबत
सांगितले जात आहे की, अल-कायदाचा म्होरक्या गेल्या 7 ऑगस्ट रोजी रात्री साधारण 9 वाजता कारने प्रवास करीत होता. यादरम्यान दोन बंदूकधारकांनी त्याची गाडी थांबवली आणि अबू मोहम्मह आणि त्याच्या मुलीला गोळी घातली. मरियमचं लग्न ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा बिन लादेन याच्यासोबत झालं होतं. हमजाची यापूर्वीच हत्या झाली होती. हल्लेखोरांनी सायलेन्सरवर लावलेल्या बंदुकीचा वापर केला, त्यामुळे कोणालीही बंदुकीचा आवाजही आला नाही. आतापर्यंत या हल्ल्याची कोणत्याही देशाने जबाबदारी घेतलेली नाही. अल-कायदाने आता अबू मोहम्मद याच्या मृत्यूची घोषणा केलेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.