वॉशिंग्टन, 16 जुलै : अमेरिकेच्या जिऑलॉजिकल सर्व्हेनुसार, अलास्कात 7.4 रिश्टर स्केलच्या भुकंपाचे धक्के बसले. या भूकंपानंतर अमेरिकेच्या त्सुनामी अलर्ट यंत्रणेकडून इशारा जारी करण्यात आला आहे. भूकंप 9.3 किमी खोलीवर होता. अलास्कातील भूकंप केंद्राने सांगितले की, अलास्का, अलेउतियन, कूक इनलेट या भागात भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपामुळे जिवीत किंवा वित्त हानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. अमेरिकेच्या राष्ट्रीय त्सुनामी अलर्ट सेंटरने धोकादायक भागातील लोकांना तात्काळ उंच ठिकाणी जाण्यास सांगितलं आहे. सोशल मीडियावर धोकादायक भागांचा नकाशा देण्यात आला असून त्यात धोक्याच्या ठिकाणी लाल रंग हायलाइट केला आहे. अलास्काच्या दक्षिणेला 7.4 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा दिला आहे. समुद्र किनाऱ्यावर महिलेला दिसला विचित्र जीव, शरीर जलपरी सारखं मात्र डोकं माणसासारखं दरम्यान, अलास्का ज्वालामुखी वेधशाळेनेही राखेचा एक मोठा फुगा निघाल्यानंतर शिशाल्डिन ज्वालामुखीसाठी आणखी एक धोक्याचा इशारा जारी केला. शिशाल्डिन ज्वालामुखीचा स्फोट वाढला असून रात्री 9 च्या सुमारास समुद्र तळातून 15 हजार फूट उंचीवर राखेचे ढग दिसले. दोन आठवड्यापूर्वी अलास्कातील एंकरेजमध्ये एक भूकंपाचा धक्का बसला होता. हा भूकंप एंकरेज शहरापासून 12 मैल अंतरावर होता. तेव्हा कोणतीही जिवित किंवा वित्त हानी झाली नव्हती. अलास्कामध्ये 1964 मध्ये 9.2 रिश्टर स्केलचा भूकंप आला होता. उत्तर अमेरिकेतला आतापर्यंतचा तो सर्वात मोठा भूकंप होता. त्यामुळे एंकरेज उद्ध्वस्त झाले आणि त्सुनामी आली. यामुळे अलास्काची खाडी, अमेरिकेची पश्चिम किनारपट्टीवर विध्वंस झाला होता. त्या भूकंपात अडीचशेहून अधिक लोकांचे प्राण गेले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.