मॉस्को, 16 जुलै : रशियाच्या (Russia) भरकटलेल्या प्रवासी विमानातील (Passenger Plane) सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स (Passengers and crew members) सुखरुप असल्याच्या बातमीनं जगभरातून आनंद व्यक्त होत आहे. शुक्रवारी उड्डाण केल्यानंतर या विमानाकडून इमर्जन्सी लँडिंगची (emergency landing) मागणी करण्यात आली होती. मात्र विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच हे विमान भरकटलं आणि बेपत्ता झालं होतं. ते सापडल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
शुक्रवारी उड्डाण केलेल्या या विमानात एकूण 18 प्रवासी होते. त्यापैकी 15 प्रवासी आणि 3 क्रू मेंबर्स असल्याची माहिती आहे. सायबेरिअन भागातील टोम्स या ठिकाणी वैमानिकानं या विमानाचं सेफ लँडिंग करण्यात यश मिळवलं होतं. या विमानातील सर्व 15 प्रवासी आणि 3 क्रू मेंबर्स सुरक्षित असून त्यांना त्चांच्या मुक्कामी पोहोचवण्यात आल्याची माहिती रशियाच्या सरकारकडून देण्यात आली आहे.
असं होतं विमान
हे विमान AN-28 या प्रकारातलं असून 2012 साली याच जातीचं एक विमान क्रॅश होऊन 10 जणांचा मृत्यू झाला होता. रशियन बनावटीचं हे छोटेखानी विमान असून देशांतर्गत वाहतुकीसाठी त्याचा वापर करण्यात येतो. स्थानिक इला एअरलाईन्सच्या मालकीचं हे विमान असल्याची माहिती मिळत आहे.
हे वाचा -ओह माय गॉड ! ‘या’ देशात एकाच जागी सापडले 20 हजार सांगाडे
दुसरा अपघात
काही दिवसांपूर्वीच रशियाच्या AN-26 या विमानाला अपघात होऊन 28 जणांचा मृत्यू झाला होता. हे अपघातग्रस्त विमान ऍंटोनोव्ह कंपनीचं असून 1969 ते 1986 या काळात ही विमानं तयार करण्यात आली होती. छोट्या आकाराची आणि सैनिकांची ने-आण करण्यासाठी उपयुक्त ठरणारी ही विमानं होती. ही विमानं जुनी झाल्यामुळे ती आंतरराष्ट्रीय सेवेतून बाद करून केवळ देशांतर्गत सेवेसाठी वापरली जात होती. विमानांना सेवेत घेण्याचे निकष रशियानं काही दिवसांपूर्वीच कडक केले आहेत. मात्र तरीही हा अपघात झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aeronautics, Russia