मराठी बातम्या /बातम्या /विदेश /बार-पब आणि नाइट क्लबमध्ये मिळणार नाही दारू; पण काय आहे कारण?

बार-पब आणि नाइट क्लबमध्ये मिळणार नाही दारू; पण काय आहे कारण?

 कोरोनामुळे (Coronavirus) गेल्या कित्येक महिन्यांपासून जगभरातले बार, पब आणि नाइट क्लबवर निर्बंध लागू करण्यात आले होते. आता जगभरात हळूहळू पुन्हा अनलॉक होत आहे.

कोरोनामुळे (Coronavirus) गेल्या कित्येक महिन्यांपासून जगभरातले बार, पब आणि नाइट क्लबवर निर्बंध लागू करण्यात आले होते. आता जगभरात हळूहळू पुन्हा अनलॉक होत आहे.

कोरोनामुळे (Coronavirus) गेल्या कित्येक महिन्यांपासून जगभरातले बार, पब आणि नाइट क्लबवर निर्बंध लागू करण्यात आले होते. आता जगभरात हळूहळू पुन्हा अनलॉक होत आहे.

    स्पेन, 27 ऑक्टोबर : कोरोनामुळे (Coronavirus) गेल्या कित्येक महिन्यांपासून जगभरातले बार, पब आणि नाइट क्लबवर निर्बंध लागू करण्यात आले होते. आता जगभरात हळूहळू पुन्हा अनलॉक होत आहे. त्यामुळे ही ठिकाणेही पूर्वीप्रमाणे सुरू होऊ लागली आहेत; मात्र कोरोना निर्बंधांनंतर आता या ठिकाणांवर नवीन संकट ओढवलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्पेनमधले बार, पब आणि क्लबमध्ये दारूची मोठी टंचाई (Spain liquor crisis) निर्माण होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येतो आहे. त्यामुळे स्पेनमधल्या मद्यपींना अनलॉकचाही काही फायदा होणार नाहीये.

    संपूर्ण स्पेनमध्ये दारूची टंचाई निर्माण होण्याचं कारण म्हणजे दारूचा कमी झालेला पुरवठा. मिळालेल्या माहितीनुसार, स्पेनमधले मद्यनिर्माते आपलं जवळपास 40 टक्के उत्पादन परदेशांमध्ये निर्यात (Spain liquor export) करतात. यामध्ये व्हिस्की, जिन, व्होडका आणि रमचा समावेश आहे. देशात कमी पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय ट्रान्सपोर्ट समस्या (International transport problem) या दोन्हींमुळे स्पॅनिश बार ओस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 'झी न्यूज'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

    खरं तर स्पेन हे कित्येक ब्रिटिशांसाठी उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवण्याचं आवडीचं ठिकाण आहे. यासोबतच, जगभरातले कित्येक पर्यटक दर वर्षी स्पेनला आणि पर्यायाने तेथील बार, पब आणि नाइट क्लबना भेट देतात; पण गेल्या दीड वर्षामध्ये कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचा तिथल्या पर्यटन व्यवसायावर आणि या बारच्या व्यवसायावरही (Spain Pub, Bar and Night club business) विपरीत परिमाण झाला आहे. त्यातच आता कुठे निर्बंध हटवले जात असताना हे नवं संकट बारमालकांसमोर उभं ठाकलं आहे.

    हे ही वाचा-भारताच्या COVAXIN ला का मिळत नाही मंजुरी? WHO नं केला खुलासा

    स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रान्सपोर्टसोबतच, काच आणि कार्डबोर्डसारख्या कच्च्या मालाचा खर्चही वाढला आहे. देशात बिअरची टंचाई (Spain Beer crisis) नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. स्पॅनिश स्पिरिट असोसिएशनचे कार्यकारी संचालक बॉस्को टोरेमोचा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत किंवा 2023च्या सुरुवातीपर्यंत परिस्थिती नियंत्रणात येऊ शकते; मात्र तोपर्यंत स्पेनमधल्या मद्यप्रेमींना या टंचाईचा सामना करावाच लागणार आहे.

    एकंदरीत दारूच्या या टंचाईबाबत स्पॅनिश सरकार काही उपाययोजना करते का किंवा मग टंचाईचा फायदा घेण्यासाठी देशातील लिकरचे भाव वाढतात का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. परिस्थिती नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत देशातील मद्यपींना ‘एकाच’ प्याल्यावर समाधान मानावं लागणार आहे.

    First published:

    Tags: Bar seal, Corona, Liquor stock, Spain