मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

भारताच्या COVAXIN ला का मिळत नाही मंजुरी? WHO नं केला खुलासा

भारताच्या COVAXIN ला का मिळत नाही मंजुरी? WHO नं केला खुलासा

जागतिक आरोग्य संघटनेत (Reasons behind delay for approval of Covaxin vaccine) मंजुरी मिळण्यासाठी कोव्हॅक्सिनची प्रतीक्षा वाढतच चालली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेत (Reasons behind delay for approval of Covaxin vaccine) मंजुरी मिळण्यासाठी कोव्हॅक्सिनची प्रतीक्षा वाढतच चालली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेत (Reasons behind delay for approval of Covaxin vaccine) मंजुरी मिळण्यासाठी कोव्हॅक्सिनची प्रतीक्षा वाढतच चालली आहे.

    दिल्ली, 22 ऑक्टोबर : जागतिक आरोग्य संघटनेत (Reasons behind delay for approval of Covaxin vaccine) मंजुरी मिळण्यासाठी कोव्हॅक्सिनची प्रतीक्षा वाढतच चालली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही प्रक्रिया सुरू (Approval process delayed) असून अद्याप या लसीचा मान्यता का मिळत नाही, असा प्रश्न भारतीयांना पडला आहे. या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला असता या विलंबाची काही कारणं समोर (Reasons behind delay) येत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेकडूनच याबाबत खुलासा करण्यात आला असून लसींना मान्यता देण्याची प्रक्रिया ही विलंबाचीच असल्याचं म्हटलं आहे. WHO नं सांगितलं हे कारण जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक डॉ. माईक रेयान यांनी दिलेल्या माहितीनुसार कुठल्याही लसीला मान्यता देण्याची प्रक्रिया ही प्रचंड गुंतागुंतीची असते. लसीचं पूर्ण परिक्षण आणि मूल्यांकन झाल्याशिवाय कुठल्याही लसीला मान्यता दिली जात नाही. एखाद्या लसीला मिळणारी मान्यता हा कोट्यवधी नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न असतो. त्यामुळे सर्व निकष तपासून पाहणं आणि वेगवेगळ्या टप्प्यांवरील चाचण्यांच्या निष्कर्षाचं पृथक्करण करणं ही अत्यंत गरजेची गोष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 26 तारखेला होणार बैठक जागतिक आरोग्य संघटनेची 26 ऑक्टोबरला लसीला मान्यता देण्याबाबत एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत लसीला मान्यता देण्यात येऊ शकते का, असा प्रश्न माध्यमांनी विचारला होता. त्याला उत्तर देताना जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी असं कुठलंही आश्वासन देण्यास नकार दिला आहे. 26 तारखेला भारत बायोटेककडून तयार करण्यात आलेल्या कोव्हॅक्सिनला आपातकालीन वापराच्या यादीत टाकण्याच्या निर्णयाबाबत चर्चा होणार आहे. मात्र इतर अनेक गोष्टींवर याचा निर्णय अवलंबून असेल, असं त्या म्हणाल्या. हे वाचा- PM मोदी आणि गृहमंत्री अमित शाह कोणता स्मार्टफोन वापरतात? पुतिन आणि किम जोंग? लवकर मान्यता मिळण्याची अपेक्षा भारतात अनेक नागरिकांनी कोव्हॅक्सिन लस घेतली आहे. अशा नागरिकांच्या परदेश प्रवासावर मर्यादा येत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनं मान्यता दिलेली नसल्यामुळे जगातील अनेक देशांत कोव्हॅक्सिन घेतलेल्या नागरिकांना प्रवेश मिळत नसल्याचं चित्र आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून मागितले जाणारे सर्व तपशील आम्ही पुरवत असून लवकरच मान्यता मिळण्याची अपेक्षा भारत बायोटेककडून व्यक्त करण्यात आली आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Corona vaccination, Who

    पुढील बातम्या