नवी दिल्ली : वर्ल्ड बँकच्या अध्यक्षपदासाठी नुकत्याच निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीआधी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी अजय बंगा यांच्या नावाची शिफारस केली होती. वर्ल्ड बँकेच्या अध्यक्षपदावरही भारतीय वंशाच्या अजय बंगा यांची निवड झाली आहे. भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक अजय बंगा यांची जागतिक बँकेच्या पुढील अध्यक्षपदी निवड झाली. बुधवारी वर्ल्ड बँकेनं याबाबत महत्त्वाची माहिती दिली. जागतिक बँकेनेकडून मिळालेल्या माहितीनुसार संस्थेच्या कार्यकारी संचालकांनी बँकेचे 14 वे अध्यक्ष म्हणून अजय बंगा यांची निवड केली. 2 जून 2023 पासून हा पदभार स्वीकारतील आणि पुढील पाच वर्षे या पदावर कार्यरत असणार आहेत.
डेव्हिडन यांनी आपला कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच राजीनामा दिला होता. त्यानंतर पुढचा अध्यक्ष कोण याबाबत चर्चा सुरू होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अजय बंगा यांच्या नावाची शिफारस जागतिक बँकेच्या पुढील अध्यक्षपदासाठी केली होती. मास्टरकार्ड या प्रसिद्ध क्रेडिट कंपनीचे सीईओ राहिलेले अजय बंगा हे इंडो-अमेरिकन आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी भारतीय वंशाच्या अरुण सुब्रमण्यम यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारीThe Executive Directors of the @WorldBank today selected Ajay Banga as the President of the World Bank. Mr. Banga begins his five-year term on June 2, 2023.
— World Bank (@WorldBank) May 3, 2023
Read the news release: https://t.co/xeSDLCwGUn pic.twitter.com/2Q2MVT0VBH
ते 63 वर्षांचे असून सध्या इक्विटी फर्म जनरल अटलांटिका या कंपनीचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. 2 जूनपासून ते वर्ल्ड बँकेच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. त्यांचा मूळचा जन्म हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात झाला. त्यांचे वडील हरभजन सिंग बंगा सैन्यात अधिकारी होते आणि 1970 मध्ये हैदराबादमध्ये तैनात होते. पुढे त्यांनी शालेय शिक्षण हैदराबाद पब्लिक स्कूलमधून पूर्ण केलं. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठात प्रवेश घेतला.
कोण आहेत विवेक रामास्वामी? ज्यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत घेतली उडीडीयूच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदवी घेतली, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अहमदाबाद (आयआयएम) मधून मॅनेजमेंटचा अभ्यास त्यांनी केला. अजय बंगा यांना 30 वर्षांपेक्षा जास्त व्यवसायाचा अनुभव आहे. ते मास्टरकार्डचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संचालक मंडळाचे सदस्य होते. ते ऑगस्ट 2009 मध्ये मास्टरकार्डमध्ये सामील झाले आणि एप्रिल 2010 मध्ये अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी झाले. याआधी त्यांनी सिटीग्रुप एशिया-पॅसिफिक रिजनचे सीईओ म्हणून काम पाहिलं आहे.