जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / ब्रेकअपनंतर अनेक दिवस गर्लफ्रेंडच्या बेडखालीच थाटलं घर; एका गोष्टीमुळे बिंग फुटलं!

ब्रेकअपनंतर अनेक दिवस गर्लफ्रेंडच्या बेडखालीच थाटलं घर; एका गोष्टीमुळे बिंग फुटलं!

ब्रेकअपनंतर अनेक दिवस गर्लफ्रेंडच्या बेडखालीच थाटलं घर; एका गोष्टीमुळे बिंग फुटलं!

शेवटी प्रेयसी या प्रकरणात कोर्टातच गेली.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 28 मार्च : जेव्हा नात्यात (Relationship issues) बांधल्यासारखं वाटत असेल तर लोक नातं संपवण्याचा निर्मय घेतला. मात्र जगात खूप कमी लोक असे असतात जे ब्रेकअप खूप समजूतदारपणे स्वीकारतात. अनेक लोक मात्र ब्रेकअपनंतर इतके तुटून जातात की काहीतरी विचित्र पाऊल उचलतात. नुकताच अमेरिकेतील एका व्यक्तीने (American man hide under girlfriend’s bed for weeks) असंच काहीसं केलं आहे. जेव्हा त्याची प्रेयसी वेगळं होण्याची मागणी करीत होती. त्यावेळी तिच्यापासून वेगळं होण्याऐवजी तो तिच्या बेडखाली जाऊन राहू लागला. ऐकायला कदाचित हे खूप विचित्र वाटत असेल, मात्र ही घटना एटलांटा (Atlanta, America) मध्ये राहणाऱ्या लिबी क्लीव्स (Libby Cleaves) हिच्यासोबत घडली. तिने सोशल मीडियावर आपल्या एक्स बॉयफ्रेंडशी संबंधित विचित्र बाब शेअर केली. डेली स्टारच्या एका रिपोर्टनुसार, महिलेने टिकटॉकवर सांगितलं की, ती एका चांगलं मुलासोबत रिलेशनशीपमध्ये होती. दोघे एकत्र चर्चला जात होते आणि लिबी त्याच्या मित्र-कुटुंबालाही भेटली होती. हे ही वाचा- स्लो मोशन स्पीड, काही क्षणात सोडली मिसाइल! VIDEO मध्ये पाहा Kim Jong यांची टशन बॉयफ्रेंडच्या ब्रेकअप करण्याचं ठरवलं होतं.. दोघे लवकरच लग्न करण्याबद्दलही विचार करीत होते. यानंतर मात्र लिबीसोबत असं काही घडलं की, तिने लग्न सोडून ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या एक दिवसानंतर लिबीने बेडच्या खाली श्वासोच्छवासाचा आवाज ऐकला. तिने खाली वळून पाहिलं तर बॉयफ्रेंड खाली बसला होता. लिबी एकटी असताना काय करते हे त्याला पाहायचं होतं. याशिवाय त्याने लिबीला असंही सांगितलं की, काही दिवसांपासून तो तिच्या टूथब्रशचा वापर करीत आहे. यानंतर लिबी कोर्टात गेली आणि रिस्ट्रेनिंग ऑर्डर घेतली. ज्यानंतर एक्स बॉयफ्रेंड तिच्यापासून लांब राहू लागला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात