जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / पतीसोबत Divorce घेतल्यानंतर 30 वर्षीय तरुणीने आपल्या सासऱ्याशी बांधली लग्नगाठ

पतीसोबत Divorce घेतल्यानंतर 30 वर्षीय तरुणीने आपल्या सासऱ्याशी बांधली लग्नगाठ

पतीसोबत Divorce घेतल्यानंतर 30 वर्षीय तरुणीने आपल्या सासऱ्याशी बांधली लग्नगाठ

सासऱ्यानेच तरुणीला लग्नाचं प्रपोजल दिलं होतं. त्यानंतर तरुणीने आपल्या दुप्पट वयाच्या सासऱ्यासोबत लग्न करण्यास होकारही दिला.

  • -MIN READ
  • Last Updated :

वॉशिंग्टन, 21 एप्रिल : संसारात सुखी होण्यासाठी अधिकतर लोक दुसरी संधी घेतात. म्हणजेच एक नातं तुटलं तरी दुसऱं नातं फुलविण्यासाठी प्रयत्न करतात. आणि पहिला प्रयत्न फसला तरी दुसऱ्यांना लग्न करुन नवीन जीवनाची सुरुवात करतात. अमेरिकेत (America) केंटुकीमध्ये राहणाऱ्या 31 वर्षीय एरिका क्विग्ग (Erica Quiggle) हिनेही तेच केलं. मात्र तिने दुसऱ्या कोणाशी नाही तर आपल्या चुलत सासऱ्याशी  (Stepfather-in-Law) लग्नगाठ बांधली. क्विग्गचं आपले पती जस्टिन टॉवेल यांच्यापासून घटस्फोट घेतला होता. (Divorce) ज्यानंतर तिने आपल्याहून दुप्पट वयाचे म्हणजे तब्बल 60 वर्षीय चुलत सासऱ्याशी लग्न करुन सर्वांना धक्का दिला. सासऱ्याने दिलं होतं, Marriage proposal ‘द सन’ च्या रिपोर्टनुसार एरिका क्विग्ग हिने 19 वर्षांची असताना स्थानिक कारखान्यात काम करणाऱ्या जस्टिन टॉवेल (Justin Towell) याच्याशी लग्न केलं होतं. दोघांना एक मुलंदेखील झालं. मात्र त्यानंतर दोघांमधील वादामुळे 2011 मध्ये त्यांच्या नात्यातील अंतर वाढलं. यादरम्यान एरिका चुलत सासरे जेफ क्विगल (Jeff Quiggle) यांच्या जवळ गेसी. 2017 मध्ये जेव्हा एरिका आणि जस्टिन यांच्यात घटस्फोट झाला, तर चुलत सासऱ्यांनी महिलेला लग्नाचा प्रस्ताव दिला. काही वेळापर्यंत एरिकाने या प्रस्तावाचा स्वीकार केला नाही, मात्र त्यानंतर ती तयार झाली. दोघांच्या वयात 29 वर्षांचं अंतर त्या दोघांमध्ये 29 वर्षांचं अंतर आहे. आज दोघे पती-पत्नी म्हणून आपलं आयुष्य घालवत आहेत. लग्नाच्या एक वर्षानंतर एरिका क्विग्गने एका मुलीला जन्म दिला आहे. आता दोन्ही मुलं आपल्या आईसोबत राहतात. आपल्या निर्णयावर आनंद व्यक्त करीत महिलेने सांगितलं की, मी आधीचे पती जस्टिनच्या बहिणीच्या माध्यमातून जेफला ओळखते. त्यांनी कठीण परिस्थितीत मला आधार दिला. त्यावेळी मला वाटलं की, आमची जोडी चांगली राहिलं. हे ही वाचा- एका कॉलने महिलेचं अकाऊंट केलं रिकामी; तब्बल 240 कोटींना लावला चुना Ex Husband नेदेखील केलं लग्न एरिका क्विग्गने सांगितलं की, जेफ वयस्कर असला तरी अजूनही त्याचं मन तरुण आहे. एरिकाचा पहिला पती जस्टिननेही दुसरं लग्न केलं आहे. आणि दोन्ही मुलांची कस्टडी त्यांना वाटून घेतली आहे. दोन्ही कुटुंबीय जवळपास मात्र वेगवेगळे राहतात. महिलेचा पहिला पती जस्टिनने सांगितलं की, आमच्या मनात एकमेकांविषयी वाईट विचार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात