एका कॉलने महिलेचं अकाऊंट केलं रिकामी; तब्बल 240 कोटींना लावला चुना

एका कॉलने महिलेचं अकाऊंट केलं रिकामी; तब्बल 240 कोटींना लावला चुना

त्यामुळे नागरिकांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 एप्रिल : अनेकांना सवय असते की, ते आपले बँक अकाऊंट नंबर (Bank Account), पासवर्ड वा पिन नंबर (Pasword) याचा फोटो काढून (Phone) फोनमध्ये सेव्ह करतात. किंवा मग त्यांना कोणता कॉल आला तर ते आपल्या अकाऊंटशी संबंधित माहिती त्यांच्यांशी शेअर करतात. अशा प्रकारच्या माहितीचा दुरुपयोग करीत कोणाचेही अकाऊंट रिकामी केले जाऊ शकते. नुकत्याच हॉन्ग कॉन्ग (Hong Kong) मध्ये चोरांनी एक 90 वर्षांच्या महिलेला 32 मिलियन डॉलर्स म्हणजेच तब्बल 240 कोटींचा चुना लावला आहे.

कशी झाली चोरी

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टमधील बातमुनासर, या महिलेला एक फोन आला होता आणि या व्यक्तीने स्वत:ला कायदेशीर प्रवर्तन अधिकारी असल्याचं सांगितलं होतं. महिलेला सांगण्यात आलं होतं की, त्यांच्या आयडेंटिटीचा उपयोग काही धोकादायक गुन्हेगार करीत आहे. ज्यामुळे महिला खूप घाबरली. इतकच नाही तर महिलेला पैसे ट्रान्सफर करण्याचा सल्ला देण्यात आला. आणि त्यांचे पैसे बेकायदेशीर आहे का याचा तपास करणार आहेत. मात्र जेव्हा पैसे परत मिळाले नाही तर त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.

हे ही वाचा-भारतीय नौसेनेला मोठं यश; अरबी समुद्रातील तब्बल 3 हजार कोटी अमली पदार्थ जप्त

या प्रकरणात एक 19 वर्षांच्या युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या विद्यार्थ्याने महिलेसोबत संवाद साधण्यासाठी फोन केला होता. गुन्हेगाराने महिलेला फोन स्कॅमरमधून फोन केला होता. या महिलेने 239 कोटी रुपये तीन अकाऊंटमध्ये जमा केले होते. महिलेने यासाठी आपल्या अकाऊंटमधून 5 महिन्यात 11 वेळा ट्रान्जॅक्शन केलं होतं.

Published by: Meenal Gangurde
First published: April 21, 2021, 3:10 PM IST

ताज्या बातम्या