मराठी बातम्या /बातम्या /विदेश /गंभीर! भारताचा VISA असलेले अफगाणी पासपोर्ट चोरीला, दहशतवादी संघटना करू शकतात दुरुपयोग

गंभीर! भारताचा VISA असलेले अफगाणी पासपोर्ट चोरीला, दहशतवादी संघटना करू शकतात दुरुपयोग

भारताचा व्हिसा (Indian VISA) मिळालेले कित्येक अफगाणिस्तानी पासपोर्ट (Afghanistan passport) चोरीला (stolen) गेल्याची खळबळजनक घटना उघडकीला आली आहे.

भारताचा व्हिसा (Indian VISA) मिळालेले कित्येक अफगाणिस्तानी पासपोर्ट (Afghanistan passport) चोरीला (stolen) गेल्याची खळबळजनक घटना उघडकीला आली आहे.

भारताचा व्हिसा (Indian VISA) मिळालेले कित्येक अफगाणिस्तानी पासपोर्ट (Afghanistan passport) चोरीला (stolen) गेल्याची खळबळजनक घटना उघडकीला आली आहे.

नवी दिल्ली, 25 ऑगस्ट : भारताचा व्हिसा (Indian VISA) मिळालेले कित्येक अफगाणिस्तानी पासपोर्ट (Afghanistan passport) चोरीला (stolen) गेल्याची खळबळजनक घटना उघडकीला आली आहे. एका ट्रॅव्हल एजन्सीकडे (Travel Agency) असणारे हे पासपोर्ट उग्रवादी गटाने चोरून नेले असून त्याचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. या पासपोर्टचा गैरवापर करून दहशतवादीदेखील भारतात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नेमके किती पासपोर्ट चोरीला गेलेत, ही माहितीदेखील अद्याप समजलेली नाही. ही चोरीची घटना उघड होताच भारत सरकारने जलद हालचाली करत अफगाणिस्तानी पासपोर्टसाठी दिलेले सर्व जुने व्हिसा रद्द केले आहेत.

अशी घडली घटना

15 ऑगस्ट रोजी तालिबाननं काबूलवर ताबा मिळवत पूर्ण अफगाणिस्तान ताब्यात घेतल्याची घोषणा केली. याच दिवशी भारतीय दूतावासाच्या सहयोगानं काम करणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल कंपनीतून भारताचा व्हिसा मिळालेले काही पासपोर्ट चोरण्यात आले. एक ऊर्दू भाषक सशस्त्र समूह या ट्रॅव्हल एजन्सीच्या कार्यालयात घुसला आणि त्यांनी पासपोर्ट चोरून नेले. हा गट पाकिस्तानच्या ISI चा समर्थक असून पाकिस्तानला मदत करणारी कामं अफगाणिस्तानमध्ये राहून पार पाडत असल्याची सूत्रांची माहिती आहे.

पासपोर्टचा शोध सुरू

चोरीला गेलेल्या पासपोर्टचा शोध घेण्याचं काम सध्या सुरू असलं तरी अफगाणिस्तानमधील अस्थिर राजकीय आणि सामाजिक परिस्थितीमुळे या कामात कितपत यश येईल, याबाबत साशंकता आहे. भारताचा व्हिसा असलेल्या या पासपोर्टचा दहशतवादी संघटनांकडून दुरुपयोग होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासाठी भारतानं खबरदारीचा उपाय म्हणून हे व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे वाचा -चारित्र्यावर संशय घेतलाच आहे तर आता लग्न करणार! जैन मुनींचा फैसला

व्हिसा केले रद्द

यापूर्वी अफगाणिस्तानच्या पासपोर्टसाठी मंजूर करण्यात आलेले व्हिसा रद्द करत असल्याची घोषणा भारताच्या वतीनं करण्यात आली आहे. ज्या अफगाणी नागरिकांना भारतात येण्यासाठी व्हिसाचा अर्ज करायचा असेल, त्यांनी www.indianvisaonline.gov.in या वेबसाईटवर अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. भारतात येण्यासाठी आता ई-व्हिसा मिळवणं गरजेचं असणार आहे. त्यामुळे पूर्वी मिळालेले सर्व व्हिसा रद्द होणार आहेत. आतापर्यंत अफगाणिस्तानातून भारतात येण्यासाठी 15 हजारपेक्षा अधिक नागरिकांनी अर्ज केले आहेत.

First published:
top videos

    Tags: Afghanistan, Passport, Taliban, Visa