Home /News /videsh /

Afghanistan Blast: मिनीबसवर हल्ला; दोन बॉम्बस्फोटात 9 जणांचा मृत्यू, 13 जखमी

Afghanistan Blast: मिनीबसवर हल्ला; दोन बॉम्बस्फोटात 9 जणांचा मृत्यू, 13 जखमी

Afghanistan Blast: मिनीबसवर (minibus) झालेल्या दुहेरी (double bomb blast) बॉम्बस्फोटात किमान 9 जण ठार तर 13 जखमी झाले आहेत.

    काबूल, 29 एप्रिल: अफगाणिस्तानच्या बाल्ख प्रांतातील मजार-ए-शरीफ (Mazar-e-Sharif) शहरात मिनीबसवर (minibus) झालेल्या दुहेरी (double bomb blast) बॉम्बस्फोटात किमान 9 जण ठार तर 13 जखमी झाले आहेत. आरोग्य अधिकाऱ्यांच्या हवाल्याने स्थानिक मीडिया रिपोर्ट्समध्ये ही माहिती देण्यात आली आहे. टोलो न्यूजनुसार, दोन्ही स्फोटांमध्ये सार्वजनिक वाहतुकीला लक्ष्य करण्यात आलं होतं. प्रांतीय आरोग्य अधिकार्‍यांनी पुष्टी केली आहे की मृतांचे मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले असून जखमींवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या स्फोटांची जबाबदारी अद्याप कोणत्याही गटानं स्वीकारलेली नाही. (Afghanistan Blast) अफगाणिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांत अनेक स्फोट झाले आहेत. काही दिवसांपूर्वी मजार-ए-शरीफमध्येच, 21 एप्रिल (गुरुवार) दुपारच्या नमाजाच्या वेळी सेह डोकान मशिदीमध्ये बॉम्बस्फोट झाला होता, ज्यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला होता आणि 58 लोक जखमी झाले होते. इसिसने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली होती. शिया मशिदीवर बॉम्ब हल्ल्याची योजना आखणाऱ्या इसिसच्या संशयित दहशतवाद्याला तालिबानी सैन्याने अटक केली. 21 एप्रिलला गुरुवारी अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये रस्त्याच्या कडेला झालेल्या स्फोटात दोन मुले जखमी झाली. शियाबहुल भागाजवळ हा स्फोट झाला. याच्या दोन दिवसांपूर्वी याच परिसरात शैक्षणिक संस्थांना लक्ष्य करून अनेक बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते. या बॉम्बस्फोटांमध्ये किमान सहा मुलांचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी झाले आहेत. अब्दुल रहीम शहीद हायस्कूलमध्ये आणि काबूलजवळील शियाबहुल भागातील दश्त-ए-बरची येथील मुमताज एज्युकेशन सेंटरजवळ हे स्फोट झाले. 22 एप्रिल रोजी कुंदुझच्या उत्तरेकडील प्रांतातील एका मशिदीत स्फोट झाला, ज्यात 33 लोक ठार झाले. तालिबानच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सत्ता हाती घेतल्यापासून तालिबान दावा करत आहेत की त्यांनी देश सुरक्षित केला आहे. मात्र आंतरराष्ट्रीय संस्था आणि विश्लेषक तालिबानच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. आंतरराष्ट्रीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की, अफगाणिस्तानमध्ये दहशतवादाचा पुन्हा उदय होण्याचा धोका आहे आणि इस्लामिक स्टेट या अतिरेकी गटानं अनेक मोठ्या हल्ल्यांचा दावा केला आहे. ISIS शिया समुदायावर करत आहे हल्ले अफगाणिस्तानमधील शिया समुदायावर अनेकदा प्राणघातक हल्ल्यांची जबाबदारी इसिसने स्वीकारली आहे. शिया अफगाण बहुतेक हजारा वांशिक समुदायाचे आहेत. देशातील 38 मिलियन लोकांपैकी 10 ते 20 टक्के लोक तेथे आहेत. तो बऱ्याच काळापासून ISIS च्या लक्ष्यावर आहे, जो त्याला विधर्मी मानतो.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Afghanistan, Kabul

    पुढील बातम्या