वॉशिंग्टन 23 मे : बलात्कारासारख्या (Rape) गंभीर घटना अनेकदा आपल्या कानावर येत असतात. मात्र, बलात्कार प्रकरणातील एखादा आरोपी अचानक अनेक वर्षांनी पीडितेला मेसेज (Message) करुन आपला गुन्हा मान्य करतो, असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का? मात्र, अशी एक घटना प्रत्यक्षात घडली आहे. या घटनेत 23 वर्षीय शॉनॉन नावाची तरुणी आपल्या बॉयफ्रेंडसोबत सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेली होती. मात्र, अनेक दिवसांनी आपलं फेसबुक अकाऊंट (Facebook Account) उघडल्यानंतर तिला भलतंच काही दिसलं. फेसबुकवर आलेला एक मेसेज पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. या मेसेजमध्ये लिहिलं होतं, की मी तुझ्यावर बलात्कार केला होता. जर तुझ्याकडे वेळ असेल तर मला तुझ्यासोबत बोलायचं आहे. तुझा आवाज ऐकायचा आहे. मी तुझ्यासाठी प्रार्थना करेल. मेसेज वाचल्यानंतर शॉनॉनला समजलं, की हा तोच आरोपी आहे, ज्यानं 2013 मध्ये एका पार्टीत तिचा पाठलाग केला होता. यानंतर तो तिच्या मागे हॉस्टेलपर्यंत गेला होता आणि तिच्यावर बलात्कार केला. अचानक आठ वर्षांनंतर त्यानं सोशल मीडियावर आपला गुन्हा मान्य केला. बलात्काराच्या या घटनेनंतर शॉनॉननं पोलिसांत याबाबत तक्रार दिली होती. मात्र, पोलिसांकडून तिला फार काही मदत मिळाली नाही. आरोपीनं फेसबुकवर केलेल्या मेसेजमुळे आतातरी आपल्याला न्याय मिळेल, असं शॉनॉनला वाटतं. याचसाठी ती आपल्या वकिलांनी भेटली आणि तिनं याबाबत त्यांच्यासोबत चर्चा केली. शॉनॉनचं म्हणणं आहे, की याविरोधात ती लढाई लढणार आणि आरोपीला याची शिक्षा भोगावीच लागणार. तिनं सांगितलं, की मागील वर्षीच पोलिसांनी हे प्रकरण बंद केलं होतं. शॉनॉन म्हणाली, अमेरिकेसारख्या देशात बलात्काराच्या खूप कमी घटनांची तक्रार पोलिसांत दाखल केली जाते. हा एक असा गुन्हा आहे, ज्यामुळे मुलीला प्रचंड त्रास होतो. मात्र, मला आशा आहे की यावेळी मला नक्की न्याय मिळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







