वादग्रस्त स्वामी 'नित्यानंद'चा नवा स्टंट, त्याच्या देशात येण्यासाठी देणार पर्यटन व्हिसा

वादग्रस्त स्वामी 'नित्यानंद'चा नवा स्टंट, त्याच्या देशात येण्यासाठी देणार पर्यटन व्हिसा

नित्यानंदचा (Nityaananda) एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत त्याने ‘व्हिसाबाजी’चा नवा स्टंट केला आहे. काही महिन्यांपूर्वी त्याने 'कैलासा' हा नवा देश जाहीर केला होता.

  • Share this:

मुंबई, 18 डिसेंबर : एक सेक्स स्कँडल आणि अहमदाबाद येथील आश्रमात मुलींचे शोषण केल्याचे आरोप असणाऱ्या आणि त्यामुळे पोलिसांच्या रडारवर असलेल्या नित्यानंद (Nithyananda) याने काही दिवसांपूर्वी ‘कैलासा’ या स्वत:च्या देशाची घोषणा केली होती. त्यानंतर आता त्याने आणखी एक नवा स्टंट केला आहे. त्याने कैलासावर पर्यटकांना येण्यासाठी व्हिसा देण्याची घोषणा केली आहे.

नित्यानंदचा नवा दावा काय?

नित्यानंदचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत त्याने ‘व्हिसाबाजी’चा नवा स्टंट केला आहे. कैलासा (Kailasa) बेटावर जाण्यासाठी त्यानं स्वत:ची ‘गरुडा’ (Garuda) ही चार्टर्ड विमान सेवा सुरु केल्याचीही सध्या चर्चा आहे. ऑस्ट्रेलियातून ही विमानसेवा असेल. या देशात येणाऱ्या पर्यटकांना फक्त तीन दिवसच राहता येणार आहे. या काळात त्यांना जेवण आणि राहण्याची मोफत व्यवस्था करण्यात येईल अशी घोषणा नित्यानंदनं केली आहे. सर्व पर्यटकांना ‘परम शिवा’ या ठिकाणाला भेट देता येईल. नित्यानंदच्या  नव्या घोषणेमुळे ऑस्ट्रेलियाच्या जवळ असलेल्या एका बेटावर तो राहत असून त्याच बेटाला त्याने ‘कैलासा’ देशाचा दर्जा दिल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

(हे वाचा-इन्स्टाग्रामवर झाला भाऊ अन् घातला 4 लाखांचा गंडा, नेमका काय आहे प्रकार)

नित्यानंदनं काही महिन्यापूर्वी त्याच्या नव्या देशात ‘रिझर्व्ह बँक ऑफ कैलासा’ स्थापन केल्याची घोषणा केली होती. त्याने आता या स्वतंत्र ई मेल सेवा सुरु केली आहे. या ई मेलच्या माध्यमातून तो व्हिसा देण्याची सर्व प्रक्रिया राबवणार आहे.

कोण आहे नित्यानंद?

तामिळनाडुचा असलेल्या नित्यानंदचे खरे नाव राजशेखरन असं आहे. त्याने 2000 साली बेंगळुरूत एक आश्रम उघडला होता. त्याच्याविरुद्ध फ्रान्सचे अधिकारीही चार लाख डॉलरच्या फसवणुकीचा तपास करत आहे. त्याचबरोबर  अहमदाबाद आश्रमातून दोन मुली बेपत्ता झाल्याच्या प्रकरणातही त्याच्या विरोधात  तक्रार दाखल करण्यात आली होती. तो 2018 साली देशातून पळून गेला होता.

Published by: News18 Desk
First published: December 18, 2020, 6:24 PM IST
Tags: visa fraud

ताज्या बातम्या