नवी दिल्ली 25 मे: पीएनबी (PNB) घोटाळा प्रकरणातील आरोपी मेहुल चोक्सी (Mehul Chauksi) गायब झाला आहे. त्याचे वकील विजय अग्रवाल यांनी असा दावा केला आहेस की आरोपी कुठेतरी गायब झाला आहे. यानंतर अँटिग्वा (Antigua) पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला आहे. मंगळवारी अँटिग्वाच्या स्थानिक रिपोर्टमध्येही चोक्सी बेपत्ता झाल्याचं म्हटलं गेलं आहे. स्थानिक रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे, की चोक्सी सोमवारी रात्री एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये डिनर करण्यासाठी घराबाहेर पडला आणि त्यानंतर पुन्हा दिसलाच नाही.
antiguanewsroom.com च्या रिपोर्टमध्ये असं म्हटलं गेलं आहे, की या हिरा व्यापाऱ्याची गाडी संध्याकाळी जॉली हार्बर येथे आढळली. हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, चोक्सीचे वकील अग्रवाल म्हणाले, की मेहुल चोक्सी गायब आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्य चिंतेत आहेत आणि त्यांनी मला बातचीत करण्यासाठी बोलावलं होतं. पोलीस सध्या याप्रकरणाचा तपास करत असून चोक्सीच्या घरचे सदस्य सध्या चिंतेत आहेत.
चोक्सीवर 4 जानेवारी 2018 ला अँटिग्वाला फरार होण्याआधी पंजाब नॅशनल बँकेसोबत 13,578 कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. पीएनबी घोटाळा प्रकरणी चोक्सीविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. तो 2013 मध्ये कथितपणे शेअर बाजाराच्या घोटाळ्यातही सामील होता. 2017 मध्ये चोक्सीनं अँटिग्वा आणि बारबुडाची नागरिकता घेतली. यानंतर काही महिन्यांतच घोटाळा समोर आला होता.
यंदा मार्च महिन्यात अँटिग्वा आणि बारबुडानं चोक्सीचं नागरिकत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. मात्र, चोक्सीनं सरकारच्या या निर्णयाविरोधात न्यायलयात धाव घेतली. अर्थमंत्री निरमला सीतारामण यांनी मार्च महिन्यात असा दावा केला होता, की फरारी विजय माल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी भारतात माघारी येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.