कुणीतरी आहे तिथे... सापडला पृथ्वीसारखाच आणखी एक ग्रह! केंब्रिजमधल्या भारतीय शास्त्रज्ञाचं यश

कुणीतरी आहे तिथे... सापडला पृथ्वीसारखाच आणखी एक ग्रह! केंब्रिजमधल्या भारतीय शास्त्रज्ञाचं यश

UK मधील केंब्रिज इन्स्टिट्यूटमधल्या शास्त्रज्ञांनी अगदी पृथ्वीसारखाच दुसऱ्या ग्रहाचा शोध घेतला आहे. त्यावर आपल्यासारखं पाणी आणि हायड्रोजनचं अस्तित्व त्यांना दिसलं आहे. या शास्त्रज्ञांच्या टीमचं नेतृत्व करणारा आहे एक भारतीय.

  • Share this:

लंडन, 27 फेब्रुवारी : केंब्रिज खगोल संस्थेत (Institute of Astronomy, Cambridge) मध्ये काम करणाऱ्या वैज्ञानिकांनी एक असा ग्रह शोधून काढला आहे जो अगदी पृथ्वीसारखा (Earth like planet) आहे. इतकंच नाही तर तिथे पृथ्वीप्रमाणे पाणी आणि हायड्रोजनचं अस्तित्वसुद्धा आहे. याशिवाय जगण्यासाठी आवश्यक असलेले विविध प्रकारचे वायू सुद्धा या ग्रहावर आहेत. पण त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे हा ग्रह आपल्या पृथ्वीच्या सौरमंडळात नाही तर पृथ्वीपासून शेकडो प्रकाशवर्षं लांब आहे.

खगोलशास्त्रज्ञांच्या ज्या समूहाने हा पृथ्वीसारखा ग्रह शोधून काढला आहे त्या टीमचं नेतृत्व भारतीय शास्त्रज्ञाने केलं आहे, ही भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे. केंब्रिज विद्यापीठाची टीम यावर गेल्या काही काळात काम करत होती. अनेक दिवसांच्या संशोधनानंतर या टीमने ज्या सूर्यमालेत या पृथ्वीसारखा ग्रह आहे त्याचा अंदाज बांधला आहे. या ग्रहाबद्दलच्या काही गोष्टी पाहिल्या तर तुम्हाला फार आश्चर्य वाटेल.

काय आहे वैशिष्ठ्य?

सध्या या ग्रहाचं नाव 2-18 बी ठेवण्यात आलं आहे. या ग्रहावरचं तापमान सुद्धा मानवासाठी सोईचं आहे. त्यामुले इथे मानवी वस्ती होऊ शकते असं या शास्त्रज्ञांना वाटतं. पाणी आणि हॅड्रोजन याशिवाय द्रवरून पाणी सुद्धा आहे असा त्यांचा दावा आहे. 2-18 बी चं आकारमान पृथ्वीच्या 2.6 टक्के जास्त आहे.

हे पण वाचा : Alert! राज्यात उष्णतेच्या लाटेबरोबर काही ठिकाणी विजांसह होणार वादळी पाऊस

आपल्या सूर्यमालेच्या खूप दूर

पृथ्वीसारखा दिसणारा हा ग्रह आपल्या सूर्यमालेच्या खूप जास्त दूर आहे. हा ग्रह यापूर्वी शोधण्यात आलेल्या के2 या पृथ्वीसारखे वातावरण असलेल्या ग्रहाच्या 124 प्रकाशवर्ष दूर आहे. महत्वाचं म्हणजे मानवी वस्तीसाठी अत्यावश्यक असणारं पाणी या ग्रहावर अस्तित्वात आहे. हे पाणी सध्या थेंबांच्या स्वरूपात आहे. या ग्रहावरचं तापमान असं आहे की, ज्यामुळे पाणी त्याचं अस्तित्व राखण्यासाठी पुरेसं आहे. पण अजूनही या ग्रहाबद्दल अजून खूप माहिती मिळणं बाकी आहे. तरीही जी माहिती सध्या मिळाली आहे, ती मानवी कल्पनेला अधिक वाव देण्यासाठी पुरेशी आहे.

कोण आहेत भारतीय शास्त्रज्ञ?

केंब्रिज खगोल अवकाश संशोधन केंद्रामध्ये काम करणारे भारतीय शास्ज्ञज्ञ आहेत डॉक्टर निक्कू मधुसूदन. डॉ. मधुसूदन यांच्या नेतृत्वाखाली जगभरातल्या शास्त्रज्ञांची टीम गेला काही काळ या नव्या ग्रहाबद्दलचं संशोधन करत होती. 2-18 बी या ग्रहावर पाणी आणि पाण्याचे अंश असल्याचे पुरावे मिळाले असले तरीही त्यावर मानवी वस्ती होऊ शकते का नाही याबद्दलचं संशोधन अद्याप बाकी आहे. पण सध्या नव्या मानवी वस्तीबद्दल आशा बाळगायला काय हरकत आहे?

First published: February 27, 2020, 8:03 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading