मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

विचित्र! ब्रिटीश राणीची हत्या करायला पोहोचली शीख व्यक्ती, कारण वाचून बसेल धक्का

विचित्र! ब्रिटीश राणीची हत्या करायला पोहोचली शीख व्यक्ती, कारण वाचून बसेल धक्का

जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी एक माथेफिरू तरुण ब्रिटीश राणीच्या महालात घुसला. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी एक माथेफिरू तरुण ब्रिटीश राणीच्या महालात घुसला. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी एक माथेफिरू तरुण ब्रिटीश राणीच्या महालात घुसला. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

  • Published by:  desk news

लंडन, 27 डिसेंबर: ख्रिसमसच्या रात्री (Christmas Night) बिर्टीश राणीची हत्या (Murder of British Queen) करण्याच्या इराद्यानं महालात घुसलेल्या एका शीख व्यक्तीला पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे. 1919 साली घडलेल्या जालीयनवाला बाग हत्याकांडाचा (Jalianwala Baug) बदला (Revenge) घेण्याची आपली इच्छा असून त्यासाठी ब्रिटीश राणीची आपण हत्या करणार असल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी या माथेफिरूला अटक केली असून त्याच्या मानसिक आरोग्याचीही तपासणी करण्यात येत आहे. 

राजवाड्यात घुसला इसम

ख्रिसमसच्या दिवशी ब्रिटीश राजवाड्यात उत्साह आणि जल्लोषाचा माहौल असताना जसवंत सिंह छैल नावाचा 19 वर्षांचा तरुण ब्रिटीश राणीच्या राजवाड्यात घुसला आणि भिंत चढून आतमध्ये जाऊ लागला. त्याच्याकडे काही शस्त्रंदेखील होती. तिथल्या सुरक्षारक्षकांनी त्याला पकडलं आणि पोलिसांच्या हवाली केलं. त्याने पगडीसह आणखी काही विचित्र पेहराव केला होता आणि त्याच्या एकंदरीत वागण्यात वेडसरपणाची झलक दिसत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

ब्रिटीश राणी एलिझाबेथ

सांगितलं हे कारण

जालियनवाला बाग हत्याकांड हे केवळ एका विशिष्ट जातीच्या लोकांना मारण्याच्या हेतूनंच केलं गेलं होतं, असा दावा करत त्याचा बदला कधी ना कधी ब्रिटीशांकडून घेतलाच गेला पाहिजे, असं हा तरुण म्हणत होता. जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्याचं काम आपणच पूर्ण करणार असून त्यासाठी आपण राजवाड्यात आलो होतो, अशी कबुलीही त्याने पोलिसांना दिली आहे. 

मेंटल हेल्थ अंतर्गत गुन्हा

स्कॉटलंड पोलिसांनी या तरुणाविरोधात मेंटल हेल्थ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याने हत्येसाठी हातात धनुष्य घेतलं होतं. हॉलिवूडचा स्टार वॉर्स हा चित्रपट पाहून तो प्रभावित झाला होता आणि त्यानं मित्रांना काही विचित्र मेसेजेसही पाठवले होते. आपला मृत्यू जवळ आला असून लवकरच आपण या जगात नसू, असं त्यानं मित्रांना कळवलं होतं. या तरुणाला पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास सुरू आहे. 

First published:

Tags: Britain, Murder, Queen