मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /अवघ्या 2 वर्षांच्या चिमुरड्यानं मुलींसारखे वाढवले आपले केस; कारण वाचून तुम्हालाही हेवा वाटेल

अवघ्या 2 वर्षांच्या चिमुरड्यानं मुलींसारखे वाढवले आपले केस; कारण वाचून तुम्हालाही हेवा वाटेल

UAE मध्ये राहणाऱ्या या दोन वर्षांच्या भारतीय चिमुरड्याने बोबडे बोल बोलत बोलत इतका मोठा निर्णय घेतला, की तुम्ही विचारही केला नसेल.

UAE मध्ये राहणाऱ्या या दोन वर्षांच्या भारतीय चिमुरड्याने बोबडे बोल बोलत बोलत इतका मोठा निर्णय घेतला, की तुम्ही विचारही केला नसेल.

UAE मध्ये राहणाऱ्या या दोन वर्षांच्या भारतीय चिमुरड्याने बोबडे बोल बोलत बोलत इतका मोठा निर्णय घेतला, की तुम्ही विचारही केला नसेल.

दुबई, 05 फेब्रुवारी :  वय वर्षे अवघं दोन वर्षे; खेळणं, बागडणं, बोबडे बोल बोलून प्रश्न विचारून सर्वांना भांबावून सोडणं, नवनवीन गोष्टी जाणून घेणं... हे सर्व या वयात अपेक्षित असतं. या वयात मुलं पूर्णपणे पालकांवर अवलंबून असतं. ज्या वयात स्वतःसाठीही काही करता येत नाही त्या वयात एका चिमुरड्यानं दुसऱ्यांसाठी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. अवघ्या दोन वर्षांचा मुलगा (2 years old boy) तक्ष जैन (taksh jain) चक्क कॅन्सरग्रस्तांसाठी (cancer) सरसावला आहे.

मूळचा भारतातील राजस्थानचा रहिवाशी असलेला तक्ष जैन. कॅन्सर म्हणजे काय हे कदाचित त्याला माहितीही नसावं. पण या कॅन्सरशी झुंजणाऱ्यांसाठी त्यानं आपला मदतीचा हात पुढे केला. बोबडे बोल बोलत बोलत तक्षनं मोठा निर्णय घेतला आणि हा निर्णय म्हणजे केसदान (hair donation) करण्याचा. यूएईत (UAE) हेअर डोनेट करणारा तो सर्वात कमी वयाचा हेअर डोनर ठरला आहे.

हे वाचा - बंद डोळ्यांनी सोडवते Rubik Cube; भारताची वंडर किड तनिष्का लय भारी

तक्षची बहीण मिशिकानंही कॅन्सरग्रस्तांसाठी हेअर डोनेट केले आहेत आणि तिच्यापासून प्रेरणा घेऊन तक्षनं हा निर्णय घेतल्याचं त्याची आई नेहा जैननं सांगितलं.

रिपोर्टनुसार, तक्षची आई नेहा म्हणाली, "तक्षची बहीण नोव्हेंबर 2019 मध्ये  मिशिका आठ वर्षांची होती, तेव्हा तिनं कॅन्सर रुग्णांसाठी आपले केसदान केले. तिच्या शाळेमार्फत ही मोहीम सुरू करण्यात आली होती. त्याबाबत ती नेहमी घरात बोलायची आणि तिचा भाऊ तक्ष ते नीट लक्ष देऊन ऐकायचा. आपल्यालाही बहिणीप्रमाणे केस दान करायचे आहेत, असं त्यानं मला सांगितलं"

हे वाचा - Relaince फाउंडेशनच्या रुग्णालयात 'वन स्टॉप ब्रेस्ट क्लिनिक' सुरू

मग नेहानं तक्षला केस वाढवायला सांगितले. तो तयारी झाला. विशिष्ट लांबीपर्यंत तक्षचे केस वाढल्यानंतर ते कॅन्सरग्रस्तांसाठी दान करण्यात आले. केस दन करणारा यूएईतील तो सर्वात कमी वयाचा हेअर डोनर बनला आहे.

First published:

Tags: Cancer