नवी दिल्ली 18 ऑगस्ट : एक अतिशय अजब घटना समोर आली आहे. यात एका महिलेला अशा कारणासाठी 34 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली, ज्याबद्दल जाणून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर 34 वर्ष या महिलेला ट्रॅव्हल बॅनचाही सामना करावा लागणार आहे. सौदी अरेबियाच्या सलमा अल-शेहबाबसोबत ही घटना घडली आहे. सलमा अल-शेहबाबने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून सौदी महिलांच्या हक्कांबाबत अनेक ट्विट रिट्विट केले होते. सलमाने तुरुंगात बंदिस्त कार्यकर्त्या लुजैन अल-हथलौल यांच्यासह इतर अनेक महिला कार्यकर्त्यांच्या सुटकेची वकिली केली होती. डेली मेलच्या वृत्तानुसार, सौदी सरकारने महिलेनं ट्विटरच्या माध्यमातून लोकांमध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. अफगाणिस्तान हादरलं, काबुलच्या मशिदीत बॉम्बस्फोट, 20 जणांचा मृत्यू महिलेच्या ट्विटमुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचत आहे, असं सांगत सौदीच्या टेररिझम न्यायालयाने तिला 34 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. सलमाला दोन मुलं आहेत. त्यापैकी एक 4 वर्षांचा तर दुसरा 6 वर्षांचा आहे. आधी तिला 6 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र सोमवारी सौदीच्या टेररिझम न्यायालयाने तिची शिक्षा 34 वर्षांपर्यंत वाढवली. सलमाची ही शिक्षा पूर्ण होताच तिच्यावर 34 वर्षांची प्रवासबंदीही लागू केली जाईल. कोर्टाने सलमाला शिक्षा सुनावली तेव्हा तिचे ट्विट आणि सोशल मीडिया अॅक्टिव्हिटीचीही चर्चा झाली. सलमाने तुरुंगात डांबलेल्या महिला कार्यकर्त्यांच्या सुटकेची मागणी केली होती, त्यात Loujain al-Hathloul यांच्याही सुटकेची प्रमुख मागणी होती. गरमागरम खाण्याच्या नादात पोहोचला तुरुंगात; रेस्टॉरंटविरोधात तक्रार करणाऱ्या ग्राहकालाच पोलिसांनी ठोकल्या बेड्या सलमाने Loujain al-Hathloul यांची बहीण लीनाचे ट्विट रिट्विट केले होते. या ट्विटमध्ये लीनाने तिची बहीण लुजैन अल-हथलौल हिच्या सुटकेची मागणी केली आहे. त्याचवेळी सलमाने हद्दपारीचं जीवन जगणाऱ्या आणि सौदीशी असहमत असलेल्या कार्यकर्त्यांचे ट्विटही रिट्विट केले होते. सलमाला जानेवारी 2021 मध्ये सौदी अरेबियात अटक करण्यात आली होती, जेव्हा ती सुट्टी घालवण्यासाठी आली होती. ती यूकेमध्ये राहत होती आणि लीड्स विद्यापीठातून पीएचडी करत होती. सलमा शिया मुस्लीम आहे. याप्रकरणी डॉ.बेथने अल हैदरी यांचे वक्तव्यही समोर आले आहे. ते अमेरिकेतील ‘मानवाधिकार संघटने’मध्ये सौदी केस मॅनेजर आहेत. डॉ अल हैदरी म्हणाले की, सौदी जगासमोर बढाई मारत आहे की महिलांच्या हितासाठी काम केले जात आहे, महिलांची स्थिती सुधारत आहे, कायदेशीर सुधारणा होत आहेत. पण, सलमाला ज्या पद्धतीने शिक्षा सुनावण्यात आली, त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, तिथली परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.